आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nandan Nilekani Very Soon Take Congress Adhar, Enter In Party

नंदन निलेकणींचा कॉंग्रेसला \'आधार\'; लवकरच प्रवेश, अनंतकुमारांशी दोन हात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - ‘आधार’ कार्यक्रमाचे प्रमुख आणि आयटी उद्योजक नंदन निलेकणी लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दिल्लीत यासंदर्भातील औपचारिक घोषणा होणार आहे, अशी माहिती कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे प्रमुख जी. परमेश्वरा यांनी शनिवारी दिली.
दिल्लीत ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत निलेकणी लवकरच काँग्रेसमध्ये दाखल होतील. औपचारिक प्रवेशानंतर त्यांची लोकसभेची उमेदवारी ठरणार आहे. त्याबाबतचा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडून घेतला जाईल, असे परमेश्वरा यांनी पत्रकारांना सांगितले. 58 वर्षीय निलेकणी हे सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून निलेकणी काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा कर्नाटकात सुरू होती. बंगळुरू दक्षिण संसदीय मतदारसंघातून त्यांना काँग्रेस लोकसभेत पाठवणार असल्याचे बोलले जाते.
अनंतकुमारांशी दोन हात- निलेकणी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्यांच्या उमेदवारीबाबतच्या चर्चेला अधिकच उधाण आले आहे. एवढेच नव्हे, तर दक्षिण बंगळुरू मतदारसंघातून पाच वेळा निवडून येणारे भाजपचे सरचिटणीस अनंतकुमार यांच्या विरोधात निलेकणी यांना रिंगणात उतरवण्याची काँग्रेसची योजना असल्याचे सूत्रांनी सांगितले. 1970 पासून काँग्रेसला या मतदारसंघातून निराशा हाती आली आहे.