आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेसलमेरमध्ये पाकिस्तानी हिंदू हेराच्या मुसक्या बांधल्या, सॅटेलाइट फोन जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ व आयबी तसेच राजस्थानच्या गुप्तचर यंत्रणेने पाकिस्तानच्या गुप्तचर नेटवर्कचा भंडाफोड केला आहे. यंत्रणेने एका पाकिस्तानी पासपोर्टच्या साह्याने भारतात आलेला पाकिस्तानी हिंदू हेर नंदलाल महाराज (२६) याला अटक केली आहे. जैसलमेर येथे त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याच्याकडून एक सॅटेलाइट फोन, दोन सेलफोन तसेच डझनभर पाकिस्तानी सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.

सूत्रांनी संागितले, पाकिस्तानला लागून असलेल्या राजस्थान सीमेवरूनआतापर्यंत ३५ किलो स्फोटके (आरडीएक्स) भारतात आणले गेल्याचा संशय आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे. या एजंटाकडून एक डायरी मिळाली असून त्यातून अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाला आहे. या एजंटाकडे लष्कराच्या काही तळांचे नकाशे व आजूबाजूचे फोन क्रमांक मिळाले आहेत. नंदलाल हा पाकिस्तानच्या खिप्रो सानगड येथील राहणारा आहे. आपण तेथे कपड्यांचे शो-रूम चालवत होतो, असे त्याने सांगितले आहे. नंदलालचे कुटुंबीय पाकिस्तानात राहते. पैशासाठी आपण हेरगिरी करत असल्याचे त्याने म्हटले आहे.

नंदलालकडून पाकिस्तानी कंपनीचे दोन मोबाइल,अनेक सीमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. त्याच्या चौकशीतून ३५ किलो आरडीएक्स भारतीय सीमेत पाठवण्यात आल्याचा खुलासा झाला आहे. हे आरडीएक्स नेमके कुठे पाठवण्यात आले हे समजू शकले नाही. त्यासंदर्भात तपास अधिकारी तब्बल ४८ ताासांपासून त्याची चौकशी करत आहेत. त्यापुढील नेटवर्कची माहिती आपल्याला नसल्याचे नंदलाल सांगत आहे. नंदलालचे सात ते आठ सहकारी होते व त्याच्या अटकेची माहिती मिळताच ते फरार झाले असून त्यांना पकडण्यासाठी शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.

डायरी महत्त्वाचा पुरावा
हेरगिराकडून जप्त करण्यात आलेल्या डायरीतून पाकिस्तानी हँडलरबाबत अनेक महत्त्वाच्या नोंदी अाहेत. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेकडून या एजंटाच्या खात्यावर कधी कधी व किती रकमा टाकण्यात आल्या त्याचीही त्यात माहिती आहे. भारतात सक्रिय पाक नेटवर्कबाबत कोडवर्डमध्ये बोलणी केली जात होती. त्या कामासाठी त्याला ७० हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळत असे.

सॅटेलाइट फोन सापडला
या हेराकडून एक सॅटेलाइट फोन देखील जप्त करण्यात आला आहे. त्या फोनवरून तो वाळवंटात तसेच निर्जन वस्तीत जाऊन पाकिस्तानी हँडलरशी बोलत होता. त्याचे सिग्नल ट्रेस करेपर्यंत हा सॅटेलाइट फोन तेथून बंद करण्यात आला होता.
बातम्या आणखी आहेत...