आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narayan Sai Wanted To See Sadhvi Performing Nude Dance In Osho Ashram

बेपत्ता नारायण साई प्रकटला जाहीरातींमध्‍ये, निर्दोश असल्‍याचा केला दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत- आसाराम बापूचा मुलगा नारायण साई बलात्‍काराच्‍या आरोपांनंतर बेपत्ता आहे. परंतु, त्‍याचा शोध घेण्‍यात येत आहे. तो परदेशात पळून जाऊ नये म्‍हणून त्‍याच्‍याविरुद्ध लूक आऊट नोटीसही जारी करण्‍यात आली आहे. परंतु, पोलिसांसमोर चौकशीसाठ हजर न होता नारायण साईने विविध वर्तमानपत्रांमध्‍ये जाहीराती दिल्‍या आहेत. गुजरातमधील काही वृत्तपत्रांमध्‍ये या जाहीराती प्रकाशित झाल्‍या असून त्‍याने निर्दोश असल्‍याचा दावा त्‍यातून केला आहे. आपण पळून जाणार नसल्‍याचेही त्‍याने म्‍हटले आहे. याप्रकरणात कायदेशीर मार्गाचाच अवलंब करणार असल्‍याचेही नारायण साईने स्‍पष्‍ट केले.

सूरत पोलिसांनी त्‍याला चौकशीसाठी हजर होण्‍यासाठी समन्‍स बजावला होता. परंतु, तो हजर झाला नाही. त्‍याउलट आज वर्तमानत्रांमध्‍ये जाहीराती प्रकाशित झाल्‍या. नारायण साईच्‍या वकीलांनी या जाहीराती दिल्‍या आहेत. त्‍यातून नारायण साईची बाजू मांडण्‍यात आली आहे. आपल्‍याला अडकविण्‍यात आले असून आरोप निराधार आहेत, असे नारायण साईने जाहीरातीतून म्हटले आहे.

नारायण साईवर बलात्‍काराचा आरोप करणा-या पीडितेने पोलिसांना आणखी 6 मुलींची नावे सांगितली आहेत. नारायण साईने त्‍यांच्‍यावरही बलात्‍कार केला होता. यापैकी 3 मुली इंदूर आणि 3 मुली बडोद्याच्‍या आहेत. पोलिसांच्‍या माहितीनुसार, पीडिता साबरकांठा येथील एका आश्रमाची संचालिकाही होती. तिने काही खळबळजनक खुलासे केले आहेत. नारायण साईची प्रचंड दहशत होती. त्‍याच्‍या भितीमुळे आश्रमातील कोणत्‍याही साधिकेची त्‍याच्‍याविरुद्ध बोलण्‍याची हिम्‍मत होत नव्‍हती, असे तिचे म्‍हणणे आहे.

पीडितेने पोलिसांना सांगितले, की देशातील विविध भागातून त्‍याने मुलींना आणले होते. या मुलींना काठमांडू येथील नागार्जून हिल येथील ओशो आश्रमात नेण्‍यात आले. त्‍यांना ध्‍यानात तल्‍लीन होऊन विवस्‍त्र अवस्‍थेत नृत्य करणारे काही जोडपे मुलींना दाखविण्‍यात आले. त्‍यांच्‍याचप्रमाणे मुलींनीही नृत्‍य करावे, अशी नारायण साईची इच्‍छा होती. पाहा आणि शिका. पुरुष आणि महिलेत कोणताही फरक नाही, असे नारायण साईने त्‍यांना सांगितले होते.

गुजरात पोलिसांनी नव्‍या माहितीच्‍या आधारावर 6 पीडित मुलींचा शोध सुरु केला आहे. तपासाच्‍या दृष्‍टीने त्‍यांचा जबाब नोंदविला जाणे आवश्‍यक आहे. त्‍या 2001 मध्‍ये जहांगीरपूरा आश्रामात सत्‍संगात सहभागी झाल्‍या होत्‍या. दरम्‍यान, याप्रकरणाची गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली असून निष्‍पक्ष तपासणीचे निर्देश त्‍यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.


सविस्‍तर बातमी वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...