आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकज खन्ना यांच्या आत्महत्येप्रकरणी नारायणगडच्‍या आमदारास 4 वर्षे तुरुंगवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नारायणगड - काँग्रेस सरकारात मुख्य संसदीय सचिव असलेले आणि नारायणगडचे आमदार रामकिशन गुर्जर आणि त्यांचे निकटवर्तीय अजित आणि विजय अग्रवाल यांना माध्यम प्रतिनिधी पंकज खन्ना यांच्या आत्महत्येप्रकरणी स्थानिक न्यायालयाने ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या तिघांना प्रत्येकी दहा हजार रुपये दंड आणि ५ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. 

न्यायालयाने निर्णय देताना म्हटले : मृत्यूपूर्वी दिलेले जबाब खरे असतात. या खटल्याशी संबंधित साक्षीदार आणि त्यांचे जबाब व परिस्थितीत अारोप सिद्ध होत असेल तर न्यायालयाच्या आत्म्यास समाधान लाभते. आपले स्वातंत्र्य कायद्याच्या चौकटीत कायम ठेवण्याची एक स्वत:ची जीवनशैली असते. कायद्यानुसार लोकशाही व्यवस्थेत स्वातंत्र्याचा आनंद घेण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीस देण्यात आलेला आहे. जर कोणी कायद्याची अवहेलना करून दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी मर्यादेचे उल्लंघन करत असेल तर एक दिवस त्यालाही वाईट परिणामास सामाेरे जावे लागणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...