बुलंदशहर- जात प्रमाणपत्र बनवण्यासाठी प्रशासनातर्फे ऑनलाइन सुविधा देण्यात आली आहे. परंतु या सुविधेमुळे प्रशासनाची चांगलीच डोकेदुख वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून फेक अर्ज दाखल केल्याचे उदाहरण अनूपशहरातील लोकवाणी जनसेवा केंद्रात घडले आहे. विशेष म्हणजे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि पोर्न स्टार सनी लियोनीच्या नावाने फेक अर्ज करण्यात आले आहे. तहसीलदार अजय कुमार अंबष्ट यांनी याप्रकरणी लोकवाणी केंद्राच्या संचालकांना याप्रकरणी उत्तर मागितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनूपशहर नगरातील लोकवाणी जनसेवा केंद्रात जात प्रमाणपत्रासाठी काही ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी चंपा रानी शेरसिंह (रा.चचरई) यांच्या अर्जावर नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आहे. दुसर्या अर्जावर कु.सनी लिओनी (रा.लिओनी तंग गल्ली, भट्ट कॉलोनी, मुंबई) असा उल्लेख आहे.
तहसीलदार अजयकुमार अंबष्ट म्हणाले, हे प्रकरण गंभीर असून याच्याकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. अर्ज प्राप्त झाल्यानंतर लोकवाणीच्या संचालकांनी तो का तपासला नाही? विशेष म्हणजे जात प्रमाणपत्र देताना स्थानक पत्ता असणे आवश्यक असताना मुंबई येथील पत्ताचा अर्ज का स्विकारण्यात आला? असे प्रश्नही अंबष्ट यांनी केला आहे. साथ ही जब तहसील के निवासियों की ओर से जाति प्रमाण पत्र के आवेदन किए जाते हैं तो मुंबई के पते से आवेदन कैसे आ गया? कामात कसूर ठेवणार्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
लोकवाणी केंद्राचे संचालक ब्रह्मपाल सिंह यांच्या मते, तहसील कार्यालयातील कर्मचार्यांनीच पासवर्ड चोरुन हे कारस्थान केले आहे. कर्मचार्यांना मला फसवण्याचे षडयंत्र रचले असून त्यांना हे केंद्र बंद करायचे आहे.