आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendr Modi Lucknow Rally Latest Live News Marathi

आगामी निवडणुकीत \'सबका\' विनाश नक्की, लखनऊमध्ये नरेंद्र मोदींची गर्जना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - येथील विजय शंखनाद रॅलीला संबोधीत करताना मोदी म्हणाले, उत्तरप्रदेशात एका मागोमाग एक सात सभा केल्या आहेत. आज येथे केशरी समुद्र दिसत आहे. अजून निवडणूका लांब आहेत मात्र, त्याआधीच देशात भाजपचे वारे वाहात आहे. हे नुसते वारे नसून हे वादळ आहे. निवडणुका घोषित झाल्यानंतर याचे सुनामीत रुपांतर होणार आहे. या सुनामीत 'सबका' विनाश नक्की आहे. 'सबका'ने सगळ्यांना लुटून खाल्ले आहे. 'स' म्हणजे समाजवादी पक्ष, 'ब' म्हणजे बहुजन समाज पक्ष, 'का' म्हणजे काँग्रेस .
मोदी म्हणाले, एक काळ होता जेव्हा लखनऊ शहराची जगात वेगळी ओळख होती. येथील 'अदब' आणि 'तहजीब' प्रसिद्ध होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये उत्तरप्रदेशमध्ये अशी काही सरकारे आली आणि त्यांनी लखनऊला बदनाम केले आहे. आता लखनऊमध्ये कव्वालीची ताण नाही तर, राजकारणाचे बेसूर सूर ऐकाला मिळतात. येथे आता संगीता ऐवजी गोळीबाराचे आवाज ऐकायला येतात. गोमतीला या सरकारांनी नाला बनवून टाकले आहे. देशाला समृद्ध करायचे असेल तर, प्रथम उत्तरप्रदेश संपन्न झाला पाहिजे. देशाच्या समृद्धीचा पाया उत्तरप्रदेश आहे. उत्तरप्रदेश समृद्ध झाल्यानंतर देशाला समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही.
विजय शंखनाद रॅलीत मोदींनी लिखित भाषण वाचून दाखविले. त्यांनी सर्वाधिक हल्ला समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांच्यावर केला. ते म्हणाले, 'नेताजी मतांचे राजकारण बंद करा आणि विकासाचे राजकारण करा. अखिलेश यादव यांच्या सरकारने गेल्या एक वर्षात 150 दंगली घडवून आणल्या आहेत. तर, गुजरातमध्ये 10 वर्षांमध्ये दंगल घडलेली नाही. साधा कर्फ्यू सुद्धा लागलेला नाही. उत्तरप्रदेशात आजही विजेचा तुटवडा आहे. गुजरातमध्ये 24 तास वीज उपलब्ध आहे.'
केंद्रीय परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांचे नाव न घेता त्यांच्यावर मोदींनी भ्रष्टाचाराचा आरोप केला. ते म्हणाले, 'अपंगाच्या नावावर एक केंद्रीय मंत्री पैसे खात आहेत. त्याला दुसरे मंत्री समर्थन देतात. आमचे केंद्रीय मंत्री 70 लाखांचा भ्रष्टाचार करणार नाहीत. जर 70 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप असता तर कदाचित मान्य केला असता. एवढे निर्लज्ज नेते उत्तरप्रदेशचे असून ते केंद्रात मंत्री आहेत.' आज लखनऊमध्ये मोदींच्या काव्य प्रतिभेलाही बहर आलो होता.
उत्तरप्रदेशमध्ये मोदींच्या सात सभा झाल्या आहेत. रविवारच्या सभेसाठी उत्तरप्रदेश भाजपने 15 लाख लोक उपस्थित राहिल्याचा दावा केला. या मैदानाची क्षमता 6 लाखांची आहे. रस्त्यांवर एलइडी स्क्रिन बसवून लखनऊच्या जनतेला सभा लाइव्ह पाहाण्याची व्यवस्था आयोजकांनी केली. सोशल मीडियावरही भाजपचा भर राहिला आहे. मोदींची सभा व्हॉट्स अॅपवर लाइव्ह केली गेली. याआधी भाजपने मोदींच्या सभेचे वेबसाइट, फेसबुक आणि ट्विटर या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलेले आहे.