आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचे प्रियंकांना उत्तर, खालच्या जातीचा असलो, तरी राजकारण खालच्या स्तराचे नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर/डुमरियागंज - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी प्रियंकाच्या 'नीच राजनीति'च्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. येथील भाजप उमेदवाराच्य प्रचारासाठी आलेले मोदी म्हणाले, 'अशा प्रकारे मर्यादा सोडून तेच राजकारण करतात. जर खरे बोलणे गुन्हा असेल, तर मला हा गुन्हा मान्य आहे. तुम्ही आता मोदीच्या जातीवर उतरले आहात. मला खालच्या जातीचे म्हटले. मी कोणाचाही अपमान केलेला नाही. केळ सत्य बोललो. हे महालात राहणारे गरिबाच्या वेदना काय समजणार. अशा लोकांना ईश्वर सुबुद्धी देवो. मी मर्यादा सोडून कधीही राजकारण केले नाही.

कोणाचाही अपमान केला नाही
मोदी पुढे म्हणाले, ही लोकशाही आहे. लोकशाहीत चहा विकणाराच काय, पण एखाद्याच्या घरी मजुरी करणारा किंवा बूट पॉलीश करणा-याचा मुलगाही पंतप्रधान बनू शकतो. मोदी यांनी प्रियंका यांचा वडिलांचा अपमान केल्याचा आरोपही फेटाळला. कोणाचा अपमान करणे स्वभावातच नसल्याचे ते म्हणाले.
चहा विकला, देश नाही
माझ्यावर अशाप्रकारचा घाणेरडा आरोप लावण्यात आला आहे. पण मी चहा विकला आहे, देश नाही. तसेच मी जातीचे राजकारणही कधी केलेले नाही. सुरुवातीला मला चहा विकणारा म्हणून हिनवण्यात आले. पण खालच्या स्तरामध्ये जन्म होणे हा गुन्हा नाही. जातीचा उल्लेख करून माझा अपमान करण्यात आला. सपा, बसपा आणि काँग्रेसवाले यूपीच्या जनतेला मूर्ख बनवत आहेत.

खालच्या स्तरातील लोकांचा अपमान करू नका
मोदी पुढे म्हणाले, ' मी कधीही कोणत्याही जातीचा द्वेष केलेला नाही. कोणत्याही ज्येष्ठाचा अपमान केलेला नाही. मी खालच्या जातीत जन्माला आलो, हे सत्य आहे. पण मी कधीही खालच्या स्तराला जाऊन राजकारण केले नाही. तुम्हाला मोदीचा हवा तेवढा अपमान करा. पण खालच्या स्तरातील माझ्या बांधवांचा अपमान करू नका.'