आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींची टीका; मला हटवण्यासाठी कट्टर विरोधक सपा-बसपा एकत्र, कुणाला कुटुंबाची तर कुणाला मुलाच्या भविष्याची चिंता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींनी पूर्ण बहुमत देण्याचे मतदारांना आवाहन केले. - Divya Marathi
मोदींनी पूर्ण बहुमत देण्याचे मतदारांना आवाहन केले.
लखनऊ- एरवी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांचे एकाही मुद्द्यावर एकमत होत नाही; पण मी काळा पैसा बाहेर काढण्याचे काम करत असल्याने मला हटवण्याची मागणी करण्यासाठी मात्र हे दोन्ही कट्टर विरोधक एकत्र आले आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लखनऊ येथील भाजपच्या महापरिवर्तन सभेत केली.
  
मोदी म्हणाले की, तुम्ही कधी सपा आणि बसपाला एकत्र पाहिले का? सपा जर सूर्योदय म्हणत असेल तर बसपा सूर्यास्त म्हणते. आता अनेक वर्षांनंतर दोन्ही पक्ष एका मुद्द्यावर एकत्र येऊन ‘मोदी को बदलो, मोदी को हटाओ’ असे म्हणत आहेत. पण मोदी म्हणत आहे की, तुमच्या नोटा बदला, काळा पैसा हटवा.  समाजवादी पक्षाच्या सरकारवर टीका करताना मोदी म्हणाले की, अखिलेश यांचे सरकार विकासातही राजकारण करत आहे. केंद्र सरकारने मदत देऊनही या सरकारने शेतकऱ्यांकडून तांदूळ खरेदी केला नाही. राज्यातील विकास १४ वर्षांच्या वनवासात गेला आहे. आता लवकरच ही स्थिती बदलेल. राज्यातील लोकांनी जात आणि कुटुंबाचे राजकारण याआधीही पाहिले आहे. आता एकदाच जातीकडे लक्ष न देता मतदान करा आणि फक्त विकासासाठी मतदान करा. मग पाहा, उत्तर प्रदेशमध्ये बदल होतो की नाही?  

गरिबांना काही दिले तरी त्रास :  नववर्षाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केलेल्या भाषणाचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, मी गरिबांसाठी काही योजना जाहीर केल्या. त्याचाही त्रास काहींना होत आहे. मी काळा पैसा बाहेर काढतो तरी त्रास होतो आणि (गरिबांना) काही देतो तरी त्याचा त्रास होतो. त्यांच्या खुर्च्यांना धक्का बसत आहे ही त्यांची समस्या आहे.  

सामान्य नागरिकच आमचे हायकमांड :  आता केंद्र सरकार स्वबळावर काही निर्णय घेत आहे. देशाला एक पंतप्रधान मिळाला आहे. सामान्य नागरिकच ज्याचे हायकमांड आहेत असे सरकार आले आहे. ज्या सरकारचे श्रेष्ठी देशातील १२५ कोटी नागरिक आहेत, असे गेल्या ३० वर्षांत प्रथमच घडले आहे, अशी टिप्पणीही मोदी यांनी केली.  

काँग्रेस, बसपा, सपावर टीका  
काँग्रेसबद्दल : काही पक्ष राज्यात कुठेही चित्रात नाहीत. एक पक्ष एका मुलाला प्रस्थापित करण्यासाठी गेल्या १५ वर्षांपासून येथे अयशस्वी प्रयत्न करत आहे. 
बसपाबद्दल : एका पक्षाला आपला पैसा कुठे ठेवायचा याची चिंता आहे. हा पक्ष बँकांच्या शोधात आहे.  
सपाबद्दल : राज्यातील एक पक्ष आपल्या कुटुंबाचे भवितव्य अबाधित ठेवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावत आहे.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...