आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Aide Amit Shah Attacks Rahul Gandhi, Calls Him

अमित शहा राहुल गांधींना म्हणाले \"पप्पू\", एका दगडात मारले दोन पक्षी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) महासचिव अमित शाह यांनी एका दगडात दोन जणांना टार्गेट केले आहे. अमित शहा यांनी कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधीसह समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्यावर शरसंधान साधले आहे.

राज्य कोणत्या परिस्थितीतून जात आहे आणि मुलायमसिंह यांना दिवसा पंतप्रधानपदाचे स्वप्न पडत असल्याचा टोला शहा यांनी लगावला आहे. याशिवाय राहुल गांधी यांना कॉंग्रेसचा 'पप्पू' म्हणूनही संबोधले आहे.

शहा म्हणाले, कॉंग्रेसने आपल्या पप्पूला पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसवण्याची तयारी केली असली तर देशात मात्र लोकशाही असल्याचा त्यांना विसर पडल्याचे दिसते. कॉंग्रेसला जनतेच्या आशीर्वादाची गरज आहे. परंतु तमाम जनता नरेंद्र मोदींच्या सोबत असल्याचे शहा यांनी उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सांगितले.

गुजरात राज्यात गेल्या दशकात एक तासापेक्षा अधिक काळ संचारबंदी लागू करण्याची वेळ आली नाही. परंतु उत्तर प्रदेशातील जनतेला दंगलीचा वीट आला आहे. नरेंद्र मोदींच्या प्रभावी प्रशासनामुळे गुजरातमध्ये सर्वत्र शांतता असल्याचा दावा शहा यांनी केला. गुजरातमध्ये वीज कपात केली जात नाही. त्यामुळे तेथे कोणालाही इन्व्हर्टर खरेदी करावे लागत नाही. परंतु उत्तर प्रदेशात नेहमी वीज गायब असल्याचे सांगून वीज संकटावर शहा यांनी प्रकाश टाकला आहे.

2014 मध्ये मोठे परिवर्तन होणार असल्याचा दावा केला असून भाजपला मोठे यश मिळणार असल्याचा आशावादही शहा यांनी व्यक्त केला आहे.