आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचे कार्यकर्त्यांना 7 ‘स’कार; भ्रष्टाचारमुक्त निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला गती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद- कोणत्याही वादग्रस्त मुद्यांचा उल्लेख न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पक्ष कार्यकर्त्यांना आपल्या आचरणात संयम आणि सहानुभूतीसह सात ‘स’कारांचे अनुसरण करण्यास सांगितले. (सेवाभाव, संतुलन, संयम, समन्वय, सकारात्मकता, सद‌्भावना, अाणि संवाद) केवळ घोषणाबाजीने लोकांचे समाधान होत नाही. देश कशा पद्धतीने भक्कम होत चालला आहे, हेही ते बघत असतात, असे मोदी म्हणाले.

भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोनदिवसीय बैठकीच्या समारोपप्रसंगी बोलताना मोदींनी कोणत्याही वादग्रस्त मुद्यांचा उल्लेख केला नाही. मात्र सत्तेचा उपयोग समाजाच्या फायद्यासाठी करा, असा सल्ला भाजप नेत्यांना दिला. सेवाभाव, संतुलन, संयम, समन्वय, सकारात्मकता, सद‌्भावना व संवाद या सात मंत्रांचे अनुसरण करण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम उत्तर प्रदेशातून हिंदूच्या पलायनाबाबत चिंता व्यक्त केली.

भ्रष्टाचारमुक्त निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला गती
मोदी सरकारच्या भ्रष्टाचारमुक्त निर्णय प्रक्रियेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला लाभ मिळत असून निर्णय प्रक्रियाही भक्कम झाल्याचा दावा भाजपने केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, केंद्राने आर्थिक दृष्टिकोन अंगीकारला आहे. त्याचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्थेचा विकास दर ७.९ टक्के झाला आहे आणि कृषी विकास दर नकारात्मक स्थितीतून बाहेर आला आहे. भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर ठरावांची माहिती त्यांनी दिली.

पुढील स्लाइडवर वाचा, मोदींनी अजून काय म्‍हटले...