आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी कालिया नाग; आधी गुजरातला आता पूर्ण देशाला दंश : लालू प्रसाद यादव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंदोलन स्‍थळावर टांग्‍यातून आलेले लालू प्रसाद यादव - Divya Marathi
आंदोलन स्‍थळावर टांग्‍यातून आलेले लालू प्रसाद यादव
पटना (बिहार) – ‘‘कलयुगात कालिया नागाने घेतलेला पुनर्जन्म म्‍हणजे नरेंद्र मोदी आहेत. आतापर्यंत ते गुजरातला दंश करत होते. आता संपूर्ण देशाला दंश करायला निघालेत. पण, आम्‍ही असे होऊ देणार नाही. नथनी घालून बिहारमधून मोदींना आम्‍ही पळवून लावू’’, अशा शब्‍दांत आरजेडीचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी आज (रविवार) पंतप्रधानांचा समाचार घेतला. जातिनिहाय जनगणनेचे आकडे प्रकाशित करावे, या मागणीसाठी पाटणा येथील गांधीनगर मैदानावर आयोजित उपोषण आंदोलनात ते बोलत होते.
लालू पुढे म्‍हणाले, ‘‘कुण्‍या जातीला आमचा विरोध नाही. उलट सर्वच जातीतील शोषित, पीडितांच्‍या हक्‍कासाठी आम्‍ही लढत आहोत’’, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. काल (शनिवार) मुजफ्फरनगरमध्‍ये येथे आयोजित रॅलीमध्‍ये मोदी यांनी आरजेडी आणि लालू यांच्‍यावर कडाडून टीका केली होती. मोदी म्‍हणाले होते, ''आरजेडीचा अर्थ म्‍हणजे रोजाना जंगलराज का डर, असे ते म्‍हणाले होते. लालू हे रेल्‍वेमंत्री होताच बिहारमध्‍ये रेल्‍वे विकासाला खीळ बसल्‍याचेही त्‍यांनी सांगितले होते.
टांग्‍यातून आले लालू
उपोषणाला बसण्‍यासाठी लालू प्रसाद यादव हे कार्यक्रम स्थळावर टांग्‍यातून आले. या आंदोलनात लालू यांच्‍याशिवाय जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव सहभागी होते. दरम्‍यान, मागणीच्‍या पूर्ततेसाठी उद्या (सोमवार) बिहारबंदचे आवाहन केले आहे.
आंदोलनाचे अधिक फोटो पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक