आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टि्वटरवर अमिताभ, शाहरुखपेक्षा मोदी मागे, सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत तिसऱ्या स्थानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदभार स्वीकारल्यानंतर टि्वटरवर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या चारपट वेगाने वाढली होती. परंतु अद्यापही ते बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन व शाहरुख खान यांच्यापेक्षा मागेच आहेत. सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत ते तिसऱ्या स्थानी आहेत.

सोशल मीडिया फोरमच्यावतीने जारी करण्यात आलेल्या २०१५ मधील सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या यादीत अमिताभ बच्चन १. ८१ कोटी फॉलोअर्ससह पहिल्या स्थानी आहेत. तर पंतप्रधान मोदींचे १. ६४ कोटी फॉलोअर्स आहेत. गेल्यावर्षी मोदींचे ४० लाख फॉलोअर्स होते."ईयर ऑफ टि्वट्र -२०१५' च्या अहवालानुसार मोदी सुपरस्टार शाहरुख खानपेक्षा जास्त मागे नाहीत. शाहरुख खानच्या फॉलोअर्सची संख्या १. ६५ कोटी इतकी आहे.
बातम्या आणखी आहेत...