आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरी लंकेश हत्येवर अजूनही PM मोदींचे मौन सुटले नाही तर पुरस्कार परत करेल - प्रकाश राज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु - गौरी लंकेश हत्याकांडावर  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडले नाही तर पुरस्कार परत करेल, असे अभिनेता प्रकाश राजने म्हटले आहे. डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रकाश राज यांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर सोशल मीडियात ज्या पद्धतीने टीका-टीप्पणी सुरु आहे त्यावरुन नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे जे लोक गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर आनंदोत्सव साजरा करत आहेत त्यांना पंतप्रधान मोदी फॉलो करतात. हत्येला महिना होत आला तरी ते यावर काहीही बोलायला तयार नाही, यामुळे प्रकाश राज यांनी मोदींवरही हल्लाबोल केला. ते माझ्यापेक्षाही मोठे कलाकार असल्याची खोचक टीका त्यांनी केली. 

प्रकाश राज म्हणाले, 'ज्या लोकांनी गौरी लंकेश यांची हत्या केली ते अद्याप पकडले गेले नाही. त्यांना पकडणे, शिक्षा करणे हा वेगळा मुद्दा आहे, मात्र देशात हजारो लोक असे आहे, जे सोशल मीडियावर आनंदोत्सव साजरा करत आहे.'
- 'आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहित आहे हे कोण लोक आहेत आणि ते कोणत्या विचारधारेचे आहेत. मृत्यूवर आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांपैकी काही असेही आहेत ज्यांना आमचे पंतप्रधान मोदी फॉलो करतात. मला याच गोष्टीची चिंता आहे, आपला देश कोणत्या दिशेने चालला आहे?'
 
राष्ट्रीय पुरस्कार परत करणार - प्रकाश राज 
- प्रकाश राज म्हणाले, 'पंतप्रधान त्यांच्या फॉलोअर्सच्या प्रतिक्रियांवर मौन बाळगून आहेत. त्यांची चुप्पी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? ते काय माझ्यापेक्षाही मोठे कलाकार होण्याचा प्रयत्न करत आहेत? त्यांचे मौन मला त्रस्त करत आहे. त्यांनी साधलेले मौन हे त्यांच्या फॉलोअर्सना मुक समर्थनाचा प्रयत्न आहे का?'
- 'जर क्रुरतेवर नरेंद्र मोदींचे हे मौन असेच कायम राहिले तर मला मिळालेले 5 राष्ट्रीय पुरस्कार परत करण्यास काहीही संकोच वोटणार नाही.'
प्रकाश राज हे दाक्षिणात्य चित्रपटांसह बॉलिवूडमध्येही काम करतात. त्यांनी खलनायकाची भूमिका साकारलेले अनेक बॉलिवूड चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. सिंघम, वॉन्टेड सारखे चित्रपटात त्यांनी काम केले आहे. 
 
कोण होत्या गौरी लंकेश
- गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबरला त्यांच्या राहात्या घरासमोर हत्या करण्यात आली होती. गौरी या साप्ताहिक 'गौरी लंकेश पत्रिके'च्या संपादक होत्या. या साप्ताहिकात जाहिराती छापल्या जात नव्हत्या. 50 जणांचा एक ग्रुप हे साप्ताहिक चालवत होता. 
- या साप्ताहिकाच्या माध्यमातून गौरी या कायम धर्मांधतेविरोधात आणि जातियवादाविरोधात लिहित होत्या. उजवी विचारसरणी आणि हिंदूत्वाच्या राजकारणाविरोधात त्यांचे लेखन असायचे. 
- गौरी यांचे वडील पी. लंकेश हे कवी, पत्रकार आणि फिल्ममेकर होते. त्यांनी 1980 मध्ये लंकेश पत्रिका सुरु केली होती. गौरी यांच्या कुटुंबात बहिण कविता, भाऊ इंद्रेश आणि आई असा परिवार आहे. कविता या देखील पित्या प्रमाणे नॅशनल फिल्म अवॉर्ड विनर आहेत.
बातम्या आणखी आहेत...