आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशन सांत्वन:मोदींनी समर्थकाच्या विधवेला केले मानसकन्या; भेटू शकले नाही, फोनवरुन केला संपर्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नेरंद्र मोदी आज (शनिवार) सांत्वन मिशनवर आहेत. भाजपच्या येथील हुंकार रॅलीदरम्यान झालेल्या स्फोटांमधील मृतांच्या नातेवाईकांची त्यांनी आज भेट घेतली. सकाळी पाटणा विमानतळावर धुके असल्यामुळे त्यांचा दौरा दीड तास उशिरा सुरू झाला. प्रथम ते गौरीचक येथे गेले, त्यानंतर कैमूर. कैमूरहून ते गोपालगंजला जाणार होते. मात्र धुक्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर लँड करु शकले नाही, त्यामुळे ते बेगसूराय येथे गेले. पाटणा बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेले गोपालगंजचे मुन्ना श्रीवास्तव यांची पत्नी प्रिया यांच्याशी मोदींनी फोनवरुन संपर्क साधला.
फोनवरून मोदींनी प्रिया श्रीवास्तव यांची विचारपूस केली. ते म्हणाले, 'हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. तुमच्या दुःखात मी सहभागी आहे. खराब हवामानामुळे मला येता आले नाही. ' त्यानंतर प्रिया श्रीवास्तव यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले की, मी त्यांना म्हणाले, आज पासून तुम्हीच माझे वडील आहात. त्यांनी देखील मला मुलगी म्हणून स्विकारले. ते म्हणाले, आयुष्यभर मी मुलगी म्हणून तुझा सांभाळ करेल. चिंता करु नको. त्यांनी माझ्या मुलीबद्दलही विचारणा केली. ती कोणत्या वर्गात आहे असे विचारले, तेव्हा मी सांगितले ती अजून दीड वर्षांची आहे. शाळेत जात नाही. प्रिया मोदींशी गुजराती भाषेत बोलत होती. त्यांनी विचारले की, तु गुजराती आहे का? तर प्रियाने मी गुजराती नाही. पण माझ्या माहेरची मंडळी अहमदाबादला राहातात त्यामुळे मला गुजराती भाषा येते असे सांगितले.