आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसींना बेनामी संपत्तीवर दावा करण्यालायकही सोडणार नाही; कारवाईचे मोदी यांचे संकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कांगडा (हिमाचल प्रदेश)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुन्हा एकदा हिमाचल प्रदेशातील प्रचारसभांत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. संुदरनगरमधील प्रचारसभेत बोलताना मोदींनी बेनामी मालमत्तांवर कारवाई करण्याचे संकेत दिले. ते म्हणाले, ‘बेनामी मालमत्तांविरुद्ध येणाऱ्या वादळामुळे गर्भगळीत झालेली काँग्रेस माझ्याविरुद्ध वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडून गरिबांची झालेली लूट परत करण्याची आता वेळ आली आहे. मी अशी परिस्थिती निर्माण करत आहे की ज्यात ते (काँग्रेसी नेते) आपल्या बेनामी मालमत्तांवर दावा करण्यालायकही राहणार नाहीत. काँग्रेस त्रस्त आहे. कारण की आधी ५००-१०००च्या नोटा आणि आता बेनामी मालमत्ताही हातातून निघून जाईल. जमीन, घर व दुकानांसारख्या बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्यांना आता सोडले जाणार नाही.’ 

तीन दिवसांतील कांगडातील दुसऱ्या सभेत मोदी म्हणाले, काँग्रेस वाळवीप्रमाणे हिमाचलात टिकलेली आहे. तिचा मुळापासून सफाया केल्याविना हिमाचलचा विकास शक्य नाही. 
 
मोदी म्हणाले, जागतिक बँकेत काम करणाऱ्यांनीच आता भारताच्या रँकिंगवर प्रश्नचिन्ह लावण्यास सुरुवात केली आहे. देशात अनेक समस्या सत्तर वर्षांपासून तशाच आहेत. त्या दूर करण्यासाठी काँग्रेस नावाची वाळवी मुळासकट उखडून फेकायला हवी.
 
काळा पैसा गमावणारे सरकारवर नाराज 
प्रचारसभेत नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेस नेते विद्यमान मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या प्रचारात सहभागी होणेदेखील टाळत आहेत. काँग्रेसने काळ्या पैशाच्या वर्धापनाचा दिन साजरा करण्याचे जाहीर केले आहे. हा विरोधकांच्या भूमिकेचा विरोधाभास आहे. कारण काळ्या पैशाच्या विरोधातील ही सरकारची लढाई आहे. त्यालाच काँग्रेसने विरोध सुरू केला आहे. खरे तर गरीब व मध्यमवर्गीयांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला. मात्र काळा पैसा गमावणारे सरकारवर नाराज आहेत.
 
 जीएसटी : छोट्या व्यावसायिकांना मिळेल दिलासा
 जीएसटीमुळे त्रस्त झालेल्या छोट्या व्यापारी आणि व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दिले. एका कार्यक्रमात मोदी म्हणाले, की जीएसटी परिषद अनेक दिलासादायक घाेषणा करू शकते. ते म्हणाले, छोट्या व्यापाऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्यांच्या मंत्र्यांच्या एक समितीने अनेक सूचनांना सहमती दर्शवली आहे. याबाबत अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली येत्या ९ आणि १० नोव्हेंबरला गुवाहाटीत होणाऱ्या जीएसटी परिषदेत घोषणा केल्या जाऊ शकतात.
 
काँग्रेसची घाबरगुंडी  
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात माझी पुढची कारवाई काय असेल, असा विचार करून काँग्रेस पक्ष घाबरून गेला आहे. त्यामुळे काँग्रेसने जनतेची दिशाभूल करण्यास सुरुवात केली आहे, अशी टीका मोदींनी आपल्या भाषणातून केली.  
बातम्या आणखी आहेत...