आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यत्र तत्र सर्वत्र ‘नमो’; चेन्नईत ‘नमो फिश’चे उद्या मोफत वाटप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- लोकसभा निवडणूक प्रचारातील ‘नमो’ची जादू अजूनही ओसरलेली दिसत नाही. त्यामुळेच नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील त्या दिवशी चेन्नईतील किनारपट्टीवरील लोक ‘नमो फिश’चा स्वाद आनंदाने चाखू लागतील. अर्थात, 26 मे रोजी मोदी पंतप्रधान झाल्याच्या निमित्ताने अशा प्रकारचे मासे मोफत वाटले जाणार आहेत. संकारा, कोला हे प्रसिद्ध माशांचे वाटप सोमवारी केले जाणार आहे. या उपक्रमाला नमो फिश असे नाव देण्यात आले आहे.

आता आंब्याचे नवे वाण ‘नमो आम’
लखनऊ- उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध आंबा उत्पादक पद्मश्री हाजी कलिमुल्ला यांनी आंब्याचे नवे वाण विकसित केले आहे. त्याला नमो आम असे नाव देण्यात आले आहे. आंब्याच्या नवीन वाणामध्ये हुस्न-ए-आरा आणि दशेरी या वाणांचे मिश्रण आढळून येते. अर्थात, दिसायला सुंदर आणि चवीला मधुर अशी याची वैशिष्ट्ये आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याच्या निमित्ताने त्यांना हे वाण समर्पित करण्यात आल्याचे कलिमुल्ला यांनी सांगितले. कलिमुल्ला यांची मँगो किंग अशी ओळख आहे.

छायाचित्र- अमृतसर । नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाच्या पार्श्वभूमीवर येथील एका कलाकाराने कपांच्या साह्याने असे अभिनंदन केले.