आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिराजींनी नोटबंदी केली असती तर आम्हाला गरज पडली नसती- मोदी; काँग्रेसवर हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुलू/ पालमपूर /उना- हिमाचल प्रदेशात रविवारी आपल्या अखेरच्या प्रचार दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. कुलू, पालमपूर व उनातील सभांत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे नाव घेऊन टीका केली.

मोदी म्हणाले, इंदिरा गांधींनी तेव्हा नोटाबंदी केली असती तर आता आम्हाला ती करावी लागली नसती. राजीव गांधींच्या १५ पैशांच्या वक्तव्यावर निशाणा साधला. राजीव असे डॉक्टर होते,ज्यांनी केवळ आजार सांगितला, त्यावर इलाज सांगितला नाही. काँग्रेसला गरिबांचा हक्क  हिरावणारे व भ्रष्टाचार करणारा सर्वांत मोठा पक्ष संबोधत म्हटले की, सरकारने सबसिडीचे सुमारे ५७ हजार कोटी रुपये वाचवले. काँग्रेसच्या काळात मध्यस्थ ही रक्कम हडपत होते. दुकान बंद झाल्यानंतर त्यांच्याकडून हल्ले होत आहेत. काँग्रेस मैदान सोडून पळाली आहे. आपण २० वर्षांत अशी निवडणूक पाहिली नाही. ही निवडणूक भाजप नव्हे तर जनता लढत आहे. भ्रष्टाचार व वाईट कायदा- सुव्यवस्थेसाठी काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी जनता उत्सुक आहे,असे त्यांनी सांगितले.
 
नोटबंदी, जीएसटीवर म्हणाले- खोट्यासमोर झुकणार नाही
 
 
- नोटबंदी : देशाला लुटणारी काँग्रेस ‘अँटी ब्लॅकमनी डे’ साजरा करणार आहे. काँग्रेसच्या खोटारडेपणापुढे आम्ही झुकणार नाही. काँग्रेसने कितीही नाटक केले तरी देशाची लूट करणारे आता सुटू शकणार नाहीत.

- जीएसटी : जीएसटीचे लोकांनी स्वागत केले. कोणत्याही व्यावसायिक वा त्यांच्या संघटनेने विरोध केला नाही. समस्या सोडवल्या जात आहेत. जीएसटी परिषदेच्या ९-१० नोव्हेंबरच्या बैठकीत दिलासा देणारे आणखी निर्णय घेतले जातील.
 
राहुल यांचा पलटवार - ‘महंगा गैस, महंगा राशन, बंद करो खोखला भाषण’ 
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी हिमाचल प्रदेशात प्रचाराचा पहिला दौरा केला. त्यांच्या तीन सभा आहेत. त्याआधी महागाई व बेरोजगारीच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी टि्वट करून घोषणा दिली - ‘महंगी गैस, महंगा राशन, बंद करो खोखला भाषण, दाम बांधो, काम दो, वर्ना खाली करो सिंहासन.’
 
पुढील स्‍लाइडवर... भ्रष्टाचाराच्या लढ्यात दोन माजी पंतप्रधानांना टोमणे... 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...