आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी वरदान,राष्ट्रऋषीरूपाने गौरव व्हावा : रामदेव बाबा, वाचा काय आहे आयुर्वेदिक संशोधन?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरिद्वार - योगगुरू रामदेव बाबांचा संकल्प व समर्पण ही त्यांची जडीबुटी आहे. जगाला केवळ निरोगी नव्हे तर संपूर्ण निरामय जीवन हवे आहे. त्यामुळेच स्वच्छता नितांत गरजेची आहे. सर्वांनी स्वच्छता बाळगल्यास एका डॉक्टरहून अधिक प्राण वाचवता येऊ शकतील. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी वरदान असून त्यांचा राष्ट्रऋषी रूपाने गौरव व्हावा, अशा भावना योगगुरू रामदेव बाबा यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरिद्वार येथे बुधवारी पतंजली आयुर्वेद संशोधन संस्थेचे उद््घाटन करण्यात आले. त्या वेळी मोदी बोलत होते. ते म्हणाले, जे श्रेष्ठ आहे त्यावर त्याचा गौरव करण्याची ही वेळ आहे. आपल्या पूर्वजांनी संशोधनात संपूर्ण आयुष्य खर्ची घातले; परंतु आपण नंतर ते विसरलाे, असे मोदी यांनी सांगितले. सध्या संपूर्ण जग भारताचे महत्त्व जाणते. अनेक लोकांची नजर पतंजलीवर होती. बाबा कधी कोसळतील, असे विचार हे लोक करत होते. परंतु बाबा नव्हे तर देशही कोसळणार नाही. देशभरात १ लाख योग वर्ग सुरू करणार आहेत, अशी माहिती याप्रसंगी रामदेव बाबा यांनी दिली.  
 
काय आहे आयुर्वेदिक संशोधन?  
पतंजलीच्या आयुर्वेद संशोधन केंद्रात सुमारे २०० संशोधक वेगवेगळ्या जडीबुटींवर संशोधन करतील. येथे एक हर्बल उद्यानही तयार करण्यात आले आहे. केंद्राची उभारणी २०० कोटी रुपये खर्चून झाली आहे. हे देशातील सर्वात मोठे आयुर्वेदिक संशोधन केंद्र आहे, असे मानले जाते. पाच मजली केंद्र १० एकरवर सुरू करण्यात आले आहे. त्यात एक तळघरही आहे. त्यात आजारी जनावरांना आश्रय देण्यात आला आहे.  
 
आपल्‍या श्रेष्ठत्‍वाला नष्‍ट करण्‍याचे प्रयत्‍न झाले
- स्‍वामीजींनी स्‍वत: वनौषधींचा शोध लावला आहे. बालकृष्‍ण यांच्‍या वनौषधींमुळे शरीर आरोग्‍यदायी राहते. आपण मागे वळून पाहिले तर आपल्‍या लक्षात येईल की, या क्षेत्रात आपण एवढ्या उंचीवर पोहोचलो होतो की तेथपर्यंत पोहोचणे जगाला शक्‍य वाटले नाही. त्‍यामुळे त्‍यांनी आपल्‍या श्रेष्‍ठत्‍वाला नष्‍ट करण्‍याचा प्रयत्‍न केला. 
- शत्रुंनी ही संपदा नष्‍ट करण्‍याचा प्रयत्‍न केला तेव्‍हा त्‍यांच्‍याशी आपण लढलो. मात्र जेव्‍हा स्‍वकीयच या संपदेला विसरु लागले, तेव्‍हा आपल्‍यावर खरे संकट ओढावले. मात्र आता विसरण्‍याची वेळ गेली आहे. आपल्‍याकडे जे श्रेष्‍ठ आहे त्‍याचा गौरव करण्‍याची हीच वेळ आहे. परत एकदा जगाला भारताच्‍या सामर्थ्‍याचा परिचय करुन देण्‍याची हीच योग्‍य वेळ असल्‍याचे मोदी यावेळी म्‍हणाले.
 
बाबा रामदेव यांनी योगाला आंदोलन बनवले
- हजारो वर्षांपूर्वी आपल्‍या पूर्वजांनी नवनवीन शोधासाठी आपले जीवन समर्पित केले. मानवाच्‍या कल्‍याणासाठी संशोधन करणे आणि काळानूसार त्‍यात अधिकाधिक माहिती जोडत जाणे, त्‍यात सुधारणा करणे. हेच त्‍यांचे उद्दिष्‍ट होते. मात्र नंतर आपण हे थांबवले आणि जगावर प्रभाव पाडण्‍यासाठी आपण असमर्थ बनलो. 
- भारताच्‍या ऋषि-साधूंनी शोधलेल्‍या योगाचे जगभरात आकर्षण निर्माण झाले आहे. जग सध्‍या शांतिच्‍या शोधात आहे. शारीरीक स्‍वास्‍थ्‍याबरोबरच लोकांना आंतरिक शांतताही हवी आहे. योगामुळे हे सहज उपलब्‍ध झाले आहे.  
- बाबा रामदेव यांनी योगाला एक आंदोलन बनवले आहे. रामदेव बाबांनी सांगितले की, तुम्‍ही मंदीर, किचन, घर, मैदान कुठेही योगा करु शकतात. यासाठी तुम्‍हाला हिमालयात जाण्‍याची काहीही गरज नाही. 
 
मोदी एक राष्ट्र ऋषि, देशाला लाभलेले वरदान: रामदेव बाबा
- मोदी एक राष्ट्र ऋषि आणि देशाला लाभलेले वरदान आहेत. सर्जिकल स्‍ट्रइकसारखे निर्णय घेऊन मोदींनी देशाचा गौरव वाढवला आहे. असे रामदेव बाबा यावेळी म्‍हणाले.    
-  मोदी गरीब-दलितांच्‍या दु:खाला जाणतात. जोपर्यंत मोदीजी जिवंत आहेत. मी जिवंत राहिल. कोणीही देशाला नूकसान पोहोचवू शकत नाही. मोदींनी भारताला पुन्‍हा एकदा विश्‍व गुरुचा दर्जा मिळवून दिला आहे. 
- पतंजलि योगपीठातील या रिसर्च सेंटरसाठी 200 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. 
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, समारंभातील फोटोज.. 
बातम्या आणखी आहेत...