आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UPमध्‍ये बहुमतासाठी मोदींचे कालभैरव, विश्वनाथाला साकडे; अखिलेश- राहुल गांधींचाही रोड शो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी -  उत्तर प्रदेश निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी वाराणसीत मेगा रोड शो केला. प्रसिद्ध कालभैरव व काशी विश्वनाथ मंदिरात पूजाअर्चा करून या निवडणुकीत बहुमतासाठी साकडे घातले. भाजपची सर्व मदार मोदींवरच आहे.
 
अखिलेश- राहुल गांधींचाही रोड शो
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही वाराणसीत मोठा रोड शो केला. या दोन रोड शोमुळे वाराणसीत चांगलाच राजकीय धुरळा उडाला.
 
असा झाला मोदी यांचा रोड शो 
- बीएचयूजवळ येऊन रोड शोची झाली सांगता. 
- मोदींनी काळभैरव मंदिरात केली पुजा. 
- काळभैरव मंदिराच्या दिशेने रोड शो पु़ढे सरकला. 
- मोदींनी काशी विश्वनाथाच्या मंदिरात दर्शन घेऊन पुजा केली. 
- मोदींच्या रोड शोला परवानगी देण्यात आलेली नव्हती त्यामुळे कारवाई केली जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. 
 मोदींच्या रोज शोबाबत निवडणूक आयोगाचे कठोर भूमिका घेतली आहे. 
- रोड शोच्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर भाजप समर्थकांची गर्दी
- मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रोड शोला सुरुवात.
 
असा आहे मोदींचा तीन दिवसांचा दौरा 
- वाराणसी मोदींचा मतदारसंघ आहे.  याठिकाणी ते काशी विश्वनाथ मंदिर आणि काळभैरवाच्या दर्शनानंतर रोड शो करतील. रोड शो बीएचयूच्या सिंहद्वारपासून रविदास गेट, लंका, अस्सी, भदैनी, सोनारपुरा, मदनपुरा, गोदौलिया, बांस फाटकद्वारे काशी विश्वनाथ मंदिरापर्यंत पोहोचेल. 
- मंदिरात दर्शनानंतर मोदी मंदिरातून चौक, नीची बाग, मैदागिन, कोतवाली विशेश्वरगंज, गुजरात विद्या मंदिर मार्गे कालभैरव मंदिरात जातील. याठिकाणी पुडा केल्यानंतर ते परत बीएचयूला परततील. 
- त्यानंतर मोदी जौनपूरकडे रवाना होतील. त्याठिकाणी सबा झाल्यानंतर सायंकाळी 6.15 वाजता वाराणसीत टाउन हॉल मैदागिन मध्ये सभा घेतील. 
- मोदींच्या सुरक्षेसाठी तीन ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेण्यात येत आहे. 
- मोदी तीन दिवस याठिकाणी असतील. रविवारी ते ओव्हरनाइट स्टे करतील. रविवारी ते विद्यापीठ परिसरात रॅली करतील. तसेच DLW मध्ये लोकांना भेटतील. 
- प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सोमवारी रोहनिया आणि सेवापुरीमध्ये सभा घेतील. अमित शाहदेखिल आधीच वाराणसीत उपस्थित आहेत. 
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अखिलेश- राहुल गांधी आणि मोदी यांच्‍या रोड शोचे फोटोज... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...