आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी कोलकात्यात: केंद्र सरकारसह डाव्या पक्षांवर हल्लाबोल, ममतांना चुचकारले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आज कोलकात्यात असून, त्यांनी तेथील 32 वर्षे सत्ता उपभोगलेल्या डाव्या पक्षाच्या सरकारवर हल्ला चढविला. याचबरोबर त्यांनी केंद्रातील मनमोहन सिंग यांच्या सरकारवरही कडक टीकास्त्र सोडले. तसेच मोदी यांनी भविष्यातील गरज म्हणून ममता दीदींना चुचकारण्याचा प्रयत्न केला.
मोदी येथील भारत चेंबर ऑफ कॉमर्समध्ये उद्योगपतींना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते.

मोदी म्हणाले, सध्याचे केंद्रातील यूपीए सरकार कॅलेंडर पाहत नाही तर फक्त घड्याळ पाहत आहे. पंतप्रधानांनी महागाईबाबत एक समिती बनविली होती. ज्याचे अध्यक्षपद माझ्याकडे होते. मी त्यांना त्याबाबतचा अङवाल सव्वा वर्षापूर्वी दिला आहे. मात्र त्यावर काहीही चर्चा नाही की उत्तर नाही.

मोदींना विचारण्यात आले की, प्रत्येक नेत्याचे देशाचे पंतप्रधान बनावे व देशाची सेवा करावी ही इच्छा असते त्याबाबत आपण काय विचार करता, यावर मोदी म्हणाले, मी राजकीय नेता नाही, मी खूप बिगरराजकीय व्यक्ती आहे.
यूपीए सरकारवर हल्ला चढविताना ते म्हणाले, आमच्या देशाच्या जवानाचे शत्रूदेश डोके कापून नेतात व सरकार परंपरेप्रमाणे त्याबाबत गप्प बसते. आमच्या नौदलाच्या दोन जवानांची इटलीतील दोन नागरिकांनी हत्या केली त्यांना मतदान करण्यासाठी पाठविण्यात आले. आमच्या देशातील आरोपींना (ज्याच्यावर आरोप सिद्धही झालेले नसतात) तुरुंगातून आपल्या आईच्या अंत्य-संस्कारालाही सोडण्यात येत नाही.

मोदी म्हणाले, 'केंद्र सरकार गरजेच्या कामे अडवून ठेवते. एखाद्या कामात राजकीय लाभ होणार असेल तरच ती कामे केली जातात. राज्या-राज्यांत दिलेल्या मदतीत भेदभाव केला जातो. काँग्रेस पक्षाचे सत्ता असलेल्या राज्यात वेगळा निधी, मदत व विरोधी पक्षांच्या राज्य सरकारना कमी मदत दिली जाते. वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात असे होत नव्हते. याचे उदाहरण देताना ते म्हणाले, त्या काळात बंगालमध्ये डाव्या पक्षाचे सरकार होते. पण त्यांनी कधीही दिल्लीत भाजप सरकार बसले असून आम्हाला कमी निधी दिला आहे अशी ओरड केली नाही. देशात आज केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठविण्याची गरज आहे. तसेच तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा आम्ही स्वीकार करतो. पण, भेदभाव करण्याचा अधिकार तुम्हाला जनतेने दिला नाही. गुजरातमध्ये अनेक प्रस्ताव विधीमंडळात मंजूर करुन केंद्राकडे पाठविले की, सरकारचे प्रतिनिधी ना चा पाढा वाचतात. आता त्याचे कसे काय करायचे? असा सवाल मोदींनी उपस्थित केला.

नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणूका लक्षात घेऊन तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बनर्जी यांच्या कामकाजाविषयी बोलताना सांगितले की, मी जर काही बोलले तर माध्यमात दुस-या दिवसापासून गुजरात आणि पश्चिम बंगाल यांच्या सरकारमध्ये तुलना सुरु होईल. तसेच मी निवडणुकीच्या दिवसात बोलले असे सांगितले जाईल. पण मला गुजरातमध्ये काँग्रेस सरकारने सत्ता उपभोगून खोदलेले खड्डे भरण्यासाठी 10 वर्षे लागली. तर, पश्चिम बंगालमध्ये मागील 32 वर्षापासून खोदलेले खड्डे भरुन काढण्यास किती वर्षे लागतील ते तुम्हीच मला सांगा. ममता यांच्या सरकारबाबत बंगालमध्ये नाराजी आहे. मात्र त्यांनी ममता यांच्याबाबत काहीही नकारात्मक न बोलता भविष्यकालीन केंद्रातील गणितासाठी ममतांना चुचकरण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.


जेव्हा मोदींना विचारण्यात आले की, काय गुजरात मॉडेल बिहारमध्ये लागू होऊ शकते का?, यावर मोदी म्हणाले, 'गुजरातच्या मॉडेलमध्ये थोडाफार बदल करुन ते बिहारमध्येही लागू केले जावू शकते. त्यासाठी मोदीफिकेशन (मोदीमय) नव्हे तर, मॉडीफिकेशन (सुधारणा)ची गरज आहे.