आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SPL REPORT: पंतप्रधान भक्तिभावाने केदारनाथकडे, भाविक नाराजीने थांबले मुक्कामीच!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केदारनाथ - पंतप्रधान नरेंद्र माेदी हे केदारनाथला भेट देणारे तिसरे पंतप्रधान ठरणार अाहेत. मात्र, उत्तराखंड सरकारने भाविकांसाठी केलेल्या सुविधा अाकृष्ट करणाऱ्या असल्या तरी पंतप्रधानांच्या दाैऱ्यामुळे करण्यात येणाऱ्या बंदाेबस्ताचा परिणाम, त्यातच ते हरिद्वारपासून रस्ता मार्गाने सुमारे 350 किलाेमीटरचा प्रवास करणार अशा स्वरुपाची माहिती पसरल्यामुळे सर्व वातावरण बदलले अाहे. एरवी प्रचंड उत्साहाने केदारनाथ मंदिराची कपाटे उघडण्याच्या साेहळ्याला भाविक उपस्थित राहतात. मात्र प्राेटाेकाॅल, बंदाेबस्त याबाबत काहीही अधिकृत माहिती दिली जात नसल्यामुळे त्यांनी बायाेमॅट्रिक नाेंदणी असूनही केदारनाथ यात्रेच्या शुभारंभाकडे पाठ फिरविली अाहे. त्यामुळे पंतप्रधान भक्तिभावाने केदारनाथकडे तर भाविक मात्र नाराजीने मुक्कमीच थांबलेले असे चित्र दिसून येत अाहे. 
 
केदारनाथ मंदिराची कपाटे उघडण्याच्या साेहळ्यास पंतप्रधान नरेंद्र माेदी बद्रिनाथची कपाटे उघडण्याच्या साेहळ्यास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार हे अाता नक्की झाले अाहे. मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणा अाता उत्तराखंडमध्ये एकवटल्या अाहेत. दाेन्ही दाैऱ्यांमुळे सामान्य नागरिक अाणि भाविकांवर किमान 5 दिवस तरी निर्बंध येणार, त्यांना दर्शनासाठी प्रतीक्षाच करावी लागणार, याची स्पष्ट जाणीव असल्यामुळे यात्रेच्या प्रारंभी दिसून येणारा भाविकांचा प्रचंड उत्साह यावर्षी मात्र दिसून येत नाही. हेलिकाॅप्टर सेवा सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात अालेली नाही. भाविकांसाठी ही सेवा कधी सुरु हाेणार याची काहीही कल्पना नसल्यामुळे देश-विदेशातून अालेल्या दर्शनार्थींनी दाेन्ही दाैरे पूर्ण हाेईपर्यंत दर्शनासाठी जाणेच पसंत केले अाहे. पंतप्रधान रस्ता मार्गाने जाणार, प्राेटाेकाॅल अाणि रस्ते बंद राहणार असा समजामुळे काेणीही वाहनचालक हरिद्वार ते केदारनाथ गाडी नेण्याच्या मन:स्थितीत नाही. 

नियाेजनपूर्ण, मात्र सुरक्षिततेमुळे तपशील जाहीर नाही : उत्तराखंडचेराज्यपाल के. के. पाॅल, राज्याचे मुख्य सचिव एस. रामस्वामी, पाेलिस उपमहासंचालक एम. के. गणपती यांनी पंतप्रधान अाणि राष्ट्रपती यांच्या दाैऱ्यांच्या नियाेजनाबाबत उच्चस्तरीय बैठका घेतलेल्या असल्या, तरी त्याचा तपशील मात्र सुरक्षितेतेच्या कारणास्तव जाहीर करण्यात अालेला नसल्याचेदेखील सूत्रांकडून सांगण्यात अाले. मात्र त्यामुळेच रहिवासी अाणि भाविक यांच्यातील संभ्रम अाणखीनच वाढला अाहे. दर्शन किती कालावधीसाठी बंद राहणार, याची किमान माहिती तरी जाहीर करायला हवी हाेती, अशी अपेक्षा व्यक्त केली जात अाहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये वाचा, पंतप्रधान हरिद्वारलादेखील जाणार
 
हे पण वाचा... 
बातम्या आणखी आहेत...