आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष ऐवजी सशक्त राज्याचा विचार का झाला नाही, नरेंद्र मोदींचा केंद्राला सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदी आज (रविवार) प्रथमच जम्मूमध्ये आले. त्यांनी 'ललकार रॅली'ला संबोधीत केले. यावेळी त्यांनी धर्मनिरपेक्षतेचा राग आळवणा-या काँग्रेसला कलम 370 ची आठवण करुन दिली.

मोदींच्या सभेआधी काश्मीर मध्ये स्फोट झाला. त्यात दोन जणांचे प्राण गेले. एका कारखा्न्यात हा स्फोटा झाला स्फोटाचे कारण काही कळूशकलेले नाही. मात्र, यानंतर मोदींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. तसेच जम्मूतील एम.ए.एम, स्टेडियममध्ये सुरक्षा वाढवण्यात आली. मोदींना ऐकण्यासाठी दुपारपासून लोक मैदानाच्या दिशेने येत असल्याचा दावा भाजपतर्फे करण्यात आला होता. दोन लाख लोक उपस्थित झाले असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले. रविवारी दुपारी दिड वाजता आयोजित 'ललकार रॅली'ला दुपारी दोन वाजता सुरूवात झाली. या सभेवर दहशतवादाचे सावट होते मात्र कोणतीही अनुचीत घटना घडली नाही.
मोदींसोबत ललकार रॅलीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह देखील उपस्थित होते.
केंद्र सरकारवर हल्ला करताना मोदी म्हणाले, दिल्लीतील सरकार झोपलेले आहे. 2004 पासून केंद्र सरकारची झोप सुरू असून 2014 पर्यंत त्यांची ही कुंभकर्णाची झोप सुरु राहाणार आहे. आता ते जागे होतील याची शक्यता कमी आहे. कारण पाकिस्तानच्या तुरुंगात भारताचे दोन तरुण कैद होते. त्यातील एक पंजाबचे आमचे बंधु सरबजीत आणि दुसरे जम्मूमधील चमेल सिंग. पाकिस्तानने ज्या तुरुंगात सरबजीतची हत्या केली तेथेच एक आठवडाआधी चमेल सिंग यांना मारले होते. जर चमेल सिंग यांच्या हत्येनंतर केंद्र सरकारने पाकिस्तानला सुनावले असते तर सरबजीतसिंग यांचा जीव वाचला असता.

कलम 370 चा उल्लेख करुन मोदी म्हणाले, पंडित नेहरु म्हणाले होते की, काळाबरोबर हे कलम संपुष्टात येईल. केंद्र सरकार नेहरुंची ही इच्छा पूर्ण करेल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कलम 370 आजच्या परिस्थित गरज आहे का, याबद्दल संसदेत चर्चा होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मोदींनी जम्मू-काश्मिर सरकारवर पक्षपाताचा आरोप करताना राज्यातील दलित, आदिवासींना समान अधिकार देण्याची मागणी केली. ते म्हणाले, महिला आणि पुरुषांना समान अधिकार मिळाले पाहिजे. महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजे. विशेष राज्याच्या दर्जा ऐवजी सशक्त राज्य झाले पाहिजे.
मोदी म्हणाले, 'मी हिंदू किंवा मुसलमानांविषयी बोलत नाही. जम्मू-काश्मिरबद्दल बोलत आहे. विकास तिथेच होतो जिथे एकता आहे'.