आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वस्तुस्थिती सांगणे गुन्हा असेल, तर त्याची शिक्षा मला मान्य आहे; मोदींचा बचावात्मक पवित्रा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डुमरियागंज. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी डुमरियागंजमध्ये काँगे्रस आणि गांधी कुटुंबावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी मंगळवारी जातीचे कार्ड खेळले आणि लोकांकडे विचारणा केली, खालच्या जातीशी संबंधित असणे गुन्हा आहे काय? मी चहा विकला, देश तर विकला नाही?
काल (सोमवारी) मी काँग्रेस कुटुंबाची माहिती दिली होती. मात्र, काँग्रेसच्या नेत्याने खूप हलक्या शब्दांचा वापर करत मी संस्कारहीन तसेच चारित्र्यहीन असल्याचे म्हटले. वस्तुस्थिती सांगणे गुन्हा असेल, तर त्याची शिक्षा भोगण्यास तयार आहे. मी म्हणालो होतो, हैदराबादच्या विमानतळावर टी. अंजैया यांचा अपमान केला होता. हे चुकीचे असेल तर मोदींचा अपमान योग्य आहे. मात्र, वस्तुस्थिती जाणून न घेता तुम्ही मी नीच राजकारण करत असल्याचे म्हटले आहे.
परमात्म्याने अशा लोकांना सद्बुद्धी द्यावी
मी खालच्या जातीत जन्म घेऊन कधी कुणाचा अपमान केला आहे. माझ्यावर घाणेरडा आरोप केला जात आहे. साठ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही हे लोक कोणत्या मानसिकतेत जगत आहेत. या लोकांना परमात्म्याने सुबुद्धी द्यावी. मी यापेक्षा आणखी काय बोलू शकतो.
लोकशाहीमध्ये जगण्याचा हक्क तरी द्या
आमच्या अनेक पिढ्यांनी सहन केले आहे. यापुढेही त्यासाठी तयार आहोत. आम्हाला सूड उगवायचा नाही. मात्र, लोकशाहीमध्ये आम्हाला जगण्याचा हक्क तरी द्या. आमचा काय गुन्हा आहे? आम्ही खालच्या जातीचे आहोत, असे सांगत शिव्या देण्याचे ते धाडस दाखवत आहेत.
हिंदू मुस्लिमाशी आणि मुस्लिम हिंदूशी भांडत बसल्यास दोघांच्या हातात काय पडेल. कोणाचे भले होईल काय? हिंदू आणि मुस्लिमांची एकच अडचण आहे- गरिबी. हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येऊन गरिबीशी लढले पाहिजे की नको? आपण सर्व जण मिळून गरिबीशी लढू. फोडाफोडी करून खुर्ची टिकवण्याचे राजकारण आता खूप झाले. चला, विकासाचे राजकारण करू.