आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निशाणा साधण्याऐवजी काँग्रेस शस्त्रांचा परवाना दाखवते...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुमला/सासाराम/गया - नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी झारखंड आणि बिहारमध्ये निवडणूक प्रचार सभा घेतल्या. प्रचार मोहीम सुरू करण्यापूर्वीच माओवाद्यांनी दोन मोबाइल टॉवरवर स्फोट घडवून ते उडवले. त्यामुळे मोदींच्या सभेसाठीची सुरक्षाही वाढवण्यात आली. सर्वप्रथम मोदी झारखंडमधील गुमल्यात पोहोचले. ते म्हणाले, ‘वाजपेयींमुळे झारखंड राज्य निर्माण झाले.’ झारखंडच्या निमित्ताने त्यांनी लालूंवरही निशाणा साधला. त्यानंतर ते सासाराम येथे गेले. गया येथे मोदी पोहोचल्यानंतर खूप गोंधळ उडाला. लाठीमार झाला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. त्यानंतर सभा सुरू झाली. ते म्हणाले, ‘आव्हान समोर उभे असतानाही थेट निशाणा साधण्याऐवजी काँग्रेस सरकार आधी शस्त्रास्त्रांचे परवाने दाखवते.’

गुमला - हातात शस्त्रे नव्हे, तर काम आणि लेखणी हवी
गुरुवारच्या पहिल्या सभेत ते माओवाद्यांना उद्देशून म्हणाले, आपली भूमी रक्तवर्णाने नव्हे, तर विकासाच्या रंगात न्हाऊन निघाली पाहिजे. माओवाद्यांच्या हाती शस्त्र नव्हे तर काम हवे. शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या हाती लेखणी हवी. मोदी म्हणाले, झारखंडची निर्मिती वाजपेयींमुळे झाली. काँग्रेस सरकारने तुमचे काही ऐकले नाही. पंडित नेहरूंनी स्वतंत्र झारखंडच्या मागणीची थट्टा केली होती, हे विसरू नका. लालूंचे नाव न घेता मोदी म्हणाले, बिहारमध्ये असे नेते आहेत, जे म्हणाले होते की, झारखंड बनलेच तर आमच्या प्रेतांवर बनेल, दिल्लीच्या सरकारमध्ये दम असेल तर झारखंड बनवूनच दाखवा. तरीही झारखंड स्वतंत्र राज्य बनलेच. मोदी म्हणाले, काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे असत्याचा भार आहे.