आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासने खूप झाली, आता देशाला प्रबळ इच्छाशक्तीची गरज : मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बागपत - नरेंद्र मोदींनी यूपीच्या बागपत आणि हरियाणातील गोहानामध्ये सभा घेतल्या. बागपतमध्ये रालोदचे अध्यक्ष आणि केंद्रीय हवाई मंत्री अजितसिंह त्यांचे लक्ष्य होते. हरियाणाच्या गोहानामध्ये त्यांनी यूपीएच्या सरकारवर टीका केली.
'आश्वासने खूप झाली. त्यामुळे पोट भरले नाही. त्यातून व्यवस्थेत बदल झाला नाही. देश आश्वासनांनी वैतागला आहे. आता इच्छाशक्ती हवी. काँग्रेसने भलीमोठी आश्वासने दिली. आता विकास हवा, विभाजन नको. संधी पाहिजे, संधिसाधूपणा नको. कौशल्य पाहिजे, हातचालाखी नको. रोजगार पाहिजे, राजकारण नको. लोकांना सुरक्षा हवी, धार्मिकतेची तेढ नकोय. शेतकर्‍यांना वीज हवी, जातीयवादाचा आधार नको. बुजूर्गांना आधार हवाय, संघर्षाचे जीवन नकोय, हे मूलभूत परिवर्तन आणण्याची शपथ घेऊन मी पुढे जात आहे.'

मुलाने वडिलांचा मार्ग सोडला
आम्ही चौधरी चरणसिंह यांचा आदर करतो, परंतु त्यांच्या मुलाने (अजितसिंह) त्यांनी सांगितलेला मार्ग सोडला. जो मुलगा सत्तासुखासाठी वडिलांचा छळ करणार्‍या लोकांच्या कुशीत जाऊन बसतो, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल काय ? बागपतला हवेतील नव्हे, तर जमिनीवरील नेता हवाय. विमानाने जाणारा नेता शेतकर्‍यांचे भले करू शकत नाही.

शास्त्रींच्या घोषणेचा पुनरुच्चार
दिवंगत पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ असा नारा दिला होता. काँग्रेसच्या काळात सीमेवर जेवढे जवान शहीद झाले त्याहून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. काँग्रेसने जवानांना असुरक्षित केले. संपूर्ण लष्कराच्या मनोबलाचे खच्चीकरण झाले आहे. आज तर दिल्लीत सरकारचा एकच मंत्र आहे, ‘मर जवान, मर किसान.’ जवान गेले तरी यांना वेदना होत नाहीत. शेतकरी गेले तरी पर्वा नाही.

दिशाभूल करण्यासाठी माझ्या नावाचा गैरवापर होतोय
जे लोक आमचा पराभव करू इच्छितात, ते जनतेमध्ये म्हणतात, मोदींना पंतप्रधान करायचे आहे. ते दिशाभूल करण्याचे काम करतात. त्यासाठी मोदींचे नाव घेतले जात आहे. गैरसमज पसरवण्यासाठी मोदींचे नाव घेणार्‍यांना चुकूनही मत देऊ नका. ते आज एवढे खोटे बोलत आहेत...पुढे काय-काय सांगतील ?