आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेवढी चिखलफेक कराल, तेवढे कमळ फुलेल - नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिलीगुडी (पश्चिम बंगाल) - नरेंद्र मोदी गुरुवारी पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये होते. स्वाभाविकच त्यांच्या टीकेचे लक्ष्य होत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. मोदी म्हणाले, ममता व्होट बँकेचे राजकारण करत आहेत.

'बंगालमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर राज्याचा विकास होईल, असे मला वाटले होते. परंतु काहीच झाले नाही. ते लोक (ममता आणि त्यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस) केवळ व्होट बँकेचे राजकारण करत आहेत. जोपर्यंत मोदींची निंदा करत नाही, तोपर्यंत त्यांना जेवण पचत नाही. मुख्यमंत्रीजी, तुम्ही जेवढी चिखलफेक कराल, तेवढ्या मोठ्या प्रमाणात कमळ फुलेल.'

खोटे परिवर्तन झाले
बंगालमध्ये नवीन सरकार स्थापन होऊन दोन वर्षे झाली. परंतु तुम्ही काही बदल पाहिला का ? जर तुम्हाला दिल्लीत बळकट सरकार हवे असेल तर भाजपला मतदान करावे लागेल. तुम्ही खोटे परिवर्तन पाहिले आहे. आता खरा बदल पाहण्याची वेळ आली आहे.

घोटाळेबाजांना शिक्षा व्हावी
ज्या लोकांनी कोट्यवधी रुपये कमावले, लोकांचे पैसे लुटले त्यांना आणखी संधी मिळाली तर तुम्ही काय कराल ? चिट फंड घोटाळ्यातील आरोपींना कडक शिक्षा मिळायला हवी (घोटाळ्यातील बहुतांश आरोप तृणमूलशी संबंधित आहेत.)

गोरखालँडची चिंता
या डोंगराळ परिसराच्या विकासासाठी एखादे धोरण हवे. चहा आणि पर्यटनच या भागाला प्रगतिपथावर नेऊ शकते. (दार्जिलिंगमध्ये गोरखालँड जनमुक्ती मोर्चा भाजपचे समर्थन करत आहे. 2009 मध्ये मोर्चाच्या समर्थनावरच जसवंतसिंह विजयी झाले होते. या वेळी एसएस अहलुवालिया यांना भाजपचे तिकीट मिळाले.

भाषा बदलली
मोदी फेब्रुवारीमध्ये कोलकाता येथे गेले होते. त्या वेळी तृणमूल काँग्रेससोबत निवडणूकपूर्व समझोत्याची अपेक्षा होती. त्यामुळे भूमिका नरमाईची होती. बंगालमध्ये दीदी आणि दिल्लीत भाजप हवे. परंतु दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम यांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले आहे, असे मोदी त्या वेळी म्हटले होते. म्हणूनच तृणमूलवर मोदींची टीका केली.

पत्रकारांकडे माफी
जमशेदपूरमध्ये मोदी यांनी माइक हाती घेताच अनेक लोक मीडियासाठी राखीव असलेल्या ठिकाणी घुसले. त्यामुळे पत्रकारांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. त्यावर मोदींनी लोकांना फटकारले. तुम्ही 10-12 लोक पत्रकार बंधूंना त्रस करत आहात ? पत्रकार यासंबंधीची माहिती देश आणि जगभरात पोहोचवतील. तुम्ही सर्वांनी त्यांना त्यांचे काम करू द्या. तुम्हाला (पत्रकार) झालेल्या गैरसोयीबद्दल मी तुमची माफी मागतो .