आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवराज, तुमच्यासाठी गरिबी म्हणजे पर्यटनच - नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालासोर (ओडिशा). भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये प्रचारसभा घेतल्या. ओडिशाच्या बालासोर, क्योंझर आणि तलछेरचे दौरे केले. तेथे त्यांनी ओडिशा सरकारवर काळी जादी केल्याचा आरोप लावला. त्यानंतर छत्तीसगडच्या धमतरीला गेले. तेथे रमण सिंह यांच्या सरकारची स्तुती केली आणि एनडीएला विजयी करण्याचे आवाहन केले.

'युवराज, तुमच्यासाठी गरिबी म्हणजे पर्यटनच आहे. लोक जसे बद्रीनाथ, केदारनाथला जातात तसे तुम्ही फोटो काढण्यासाठी गरिबांच्या घरी जातात. निवडणुकांच्या वेळीच काँग्रेसला गरिबीचा मुद्दा आठवतो. तुम्ही काँग्रेसला 60 वर्षे दिली आहेत. मला 60 महिने द्या, मग तुम्हाला बदल पाहायला मिळेल.'

भरमसाट कोळसा असूनही वीज नाही
गुजरातमध्ये कोळशाच्या खाणी नाहीत. पण राज्यात भरपूर वीज आहे. ओडिशात मात्र कोळसा असूनही वीज नाही. पायाभूत सुविधाही नाहीत. मला माहिती आहे की, कमळ तुमच्या हृदयात आणि मनात आहे. पण मतदानाच्या वेळीही तुमचे बोट कमळापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

बिजदची जादू चालणार
ओडिशामध्ये मोठी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, पण केंद्र आणि राज्य सरकार याचा योग्य प्रकारे वापर करण्यात अक्षम ठरले आहे. त्यांनी फक्त काळी जादू केली. कोळसा व रोजगार चोरले.

बिजदची सत्ता पुन्हा नाही
जी व्यक्ती तुमची भाषा बोलत नाही, जिला तुमचे दु:ख समजत नाही, ती व्यक्ती चांगले सरकार देऊ शकणार नाही. तुमचे मुख्यमंत्री (नवीन पटनायक) तुम्हाला भेटतात आणि बोलतात? मी येथे बदल अनुभवला आहे. त्यांचे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही, हे सांगू शकतो. ओडिशाला जी देणगी मिळाली त्याचा सरकारला वापर करता आला नाही.

मला लोकांचा मूड समजतो
मला लोकांचा मूड समजतो. देशभरात लोकांना सरकार बदलण्याची इच्छा आहे. त्यांना सरकारला धडा शिकवायचा आहे. एवढ्या उन्हातही लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान केले. मी त्यांचे अभिनंदन करतो. मतदारांचा मूड पाहता मी सांगू शकतो की, काँग्रेसला खाते खोलण्यातही यश मिळू शकणार नाही.

देशाला काँग्रेसमुक्त बनवण्याचे स्वप्न
काँग्रेस बरखास्त करावी हे गांधीजींचे स्वप्न होते. आता लोकांना देश काँग्रेसमुक्त बनवण्यासाठी मदत करावी. त्यामुळे देशाला पूर्णपणे भ्रष्टाचारमुक्त बनवता येईल. केंद्राच्या घोटाळ्यांमुळे राज्य सरकारने जनतेबरोबर केलेले गैरव्यवहार जनतेसमोर येऊ शकले नाहीत. याचा अर्थ ते कमी धोकादायक आहेत, असा होत नाही.

दिल्ली अत्याचार
मॅडम सोनियांच्या डोळ्यासमोर दिल्लीत काय सुरू आहे? तुम्ही दिल्लीला बलात्कारांचे शहर बनवून ठेवले आहे. दिल्लीत निर्भया प्रकरण घडले. त्यासाठी एक हजार कोटींचा निधी जमवला. पण एक रुपयाही खर्च केला नाही. काँग्रेसने पुन्हा एक हजार कोटी बजेटमध्ये ठेवले. आकडे लिहून कारभार करायची काँग्रेसची सवय आहे.