आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्फाळमध्ये नरेंद्र मोदी गरजले, नीडोची हत्या म्हणजे राष्ट्रीय लाजीरवाणी घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इम्फाळ (मणिपूर)- भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) येथील रॅलीत कॉंग्रेसवर बरेच तोंडसुख घेतले. ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी कॉंग्रेसकडे कोणतीही ठोस योजना नाही, असे सांगून मोदी यांनी नीडोची हत्या म्हणजे राष्ट्रीय लाजीरवाणी घटना आहे, असे म्हटले आहे.
नरेंद्र मोदी यांची आज इम्फाळला रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीला संबोधित करताना मोदी यांनी नीडोसाठी प्रार्थना केली. मोदी म्हणाले, की आरोप-प्रत्यारोपांपासून दूर राहत कॉंग्रेसने नीडो प्रकरणी न्याय करायला हवा. केंद्र सरकारजवळ ईशान्येकडील राज्यांच्या विकासाची योजना नाही. भाजपचे सरकार आल्यावर ईशान्येकडील राज्यांच्या विकास केला जाईल. त्यांचे हक्क् त्यांना परत मिळवून दिले जातील.
ईशान्येकडील आठ राज्य आहेत अष्टलक्ष्मी
भाषणात मोदी म्हणाले, की ईशान्येकडील राज्य देशाची अष्टलक्ष्मी आहेत. अष्टलक्ष्मी कमळावर विराजमान असते. कॉंग्रेसने या राज्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार केला आहे. या राज्यांना लुटले आहे. भाजपचे सरकार आल्यावर कॉंग्रेसला प्रत्येक रुपयाचा जाब विचारला जाईल. परदेशातील बॅंकांमध्ये असलेला काळा पैसा भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.