आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी उतावीळ; मुलायमसिंहांकडून समाचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनभद्र/ मिर्झापूर- केंद्रामध्ये सरकार स्थापनेसाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी फारच उतावीळ झाले आहेत आणि त्या उतावळेपणापोटीच ते एकापाठोपाठ एक खोटे बोलत असल्याचे सांगत समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. मुलायमसिंह यादव म्हणाले की, गुजरात मॉडेल हा एक निव्वळ फार्स असून त्याबाबत मोदी शक्य तितके खोटे बोलत आहेत. मोदींच्या कार्यकाळात गुजरातमध्ये हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि 20 लाख लोक बेरोजगार झाले आहेत.

गुजरातमध्ये डॉक्टर आणि औषधांचा तुटवडा आहे. कुपोषणामुळे महिला आणि मुले मृत्युमुखी पडत आहेत. गुजरातमध्ये 44,000 मुले बेपत्ता असून अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही, असे मुलायमसिंह यांनी प्रचारसभेत सांगितले. देशातील मतदार सुजाण आहेत. जातीयवादी शक्तींना ते कधीही सत्तेत येऊ देणार नाहीत,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.