आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखनऊ - मुस्लिम व धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून रविवारी देशातील राजकारण पुन्हा एकदा तापले. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पार्टी ही ‘मुस्लिमांना फक्त मतांचा तुकडा’ म्हणून समजते, असा आरोप केला.
लखनऊतील विजय शंखनाद रॅलीत सपा, बसपा व काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत मोदी म्हणाले, आपले अपयश लपवण्यासाठी हे पक्ष धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा पांघरून लोकांची दिशाभूल करत आहेत. तुम्ही तर मुस्लिमांचा मताचा तुकडा करून त्यांना उद्ध्वस्त केले आहे. तुमचा धर्मनिरपेक्षतावाद केवळ मतासाठी आहे. तर आमची धर्मनिरपेक्षता देशासाठी आहे, रोजगार, सिंचन, महागाई, गरिबीबाबत बोलायचे म्हटले तर ते (मुलायमसिंह) फक्त धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरच अडून बसलेले असतात.
प्रत्येक मुस्लिमासाठी हज यात्रा आस्थेचा विषय आहे. गुजरातसाठी दरवर्षी 4,800 यात्रेकरूंचा कोटा असूनही अर्ज 38 हजार येतात. मात्र यूपीमध्ये 32 हजारांचा कोटा असूनही फक्त 35 हजार अर्ज येतात. येथे जर त्यांची परिस्थिती चांगली असली असती तर त्यांनी अर्ज केले असते. मात्र मुस्लिमांना तुम्ही मताचा तुकडा केले आहे. तुमची धर्मनिरपेक्षता म्हणजे फक्त व्होट बँकेचे राजकारण आहे. आमची धर्मनिरपेक्षता देशासाठी आहे, असे मोदी म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.