आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Utterakhand By Election, Congress Win

उत्तराखंडात मोदी लाट ओसरली; पोटनिवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेहराडून- लोकसभेत काँग्रेसचे पानिपत करणार्‍या भाजपला उत्तराखंड विधानसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मात्र हादरा बसला. या तिन्ही जागी काँग्रेस उमेदवार विजयी झाले. यातील दोन जागा पूर्वी भाजपच्या ताब्यात होत्या. लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील पाचही जागा जिंकल्या होत्या.

मुख्यमंत्री हरीश रावत यांनी धारचुलामध्ये 20 हजार, हिरासिंग बिष्ट यांनी डोईवालामधून 6 हजार मतांनी विजय मिळवला. सोमेश्वरमधून काँग्रेसच्या रेखा आर्य 9 हजार मतांनी विजयी झाल्या. 70 सदस्यीय विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ 35, भाजपचे 30 वरून 28 झाले. सहकारी पक्षांच्या पाठिंब्यावर सत्तेतील काँग्रेसला स्पष्ट बहुमतासाठी एका आमदाराची गरज आहे.

अल्पावधीतच भ्रामक चेहरा उघड
काँग्रेसचे प्रवक्ते पी.सी. चाको यांनी मोदी लाट ओसरून या लाटेचा भ्रामक चेहरा लोकसभा निवडणुकीनंतर साठ दिवसांतच स्पष्ट झाल्याचे सांगितले.