आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनला इशारा दिल्यानंतर आज मोदींची पंजाबमध्ये सभा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज जगराहोमध्ये सभा घेणार आहेत तर दूसरीकडे राहूल गांधी यांची डेहराडूनमध्ये सभा होणार आहे. या आधी मिशन 272+नूसार मोदींनी एकाच दिवशी उत्तर पूर्व भारतात तिन सभा घेऊन केवळ काँग्रेसलाच सुनवले नव्हते, तर चीन आणि पाकिस्तानलाही इशारा दिला होता. अरूणाचलमधील पासीघाटमध्ये त्यानंतर आसाम राज्यातील सिलचरध्ये तर त्रिपुरा राज्याची राजधानी अगरताळामध्ये एकाच दिवशी सभा घेतली होती.
पाकिस्तानमध्ये हाय अलर्ट जारी केले जाऊ शकते.
मोदींच्या व्यक्तव्यामुळे पाकिस्तानचे सरकार आणि लष्करी पहिल्यापेक्षा जास्त सावध झाले असून लोकसभा निवडणुकीच्या काळात अधिक संवेदनशील होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मिर आणि पंजाबमधील सभेत मोदी पाकिस्तानवर टिका करतील असा अंदाज आहे.
काय म्हणाले होते मोदी
जगातील कुठलीच शक्ती अरूणाचल प्रदेशाला भारतापासून वेगळी करू शकत नसल्याचे मोदींनी सांगितले होते. चीन नेहमीच अरूणाचल प्रदेशात पाय पसरवण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र चीनने विस्तारवादाची ही भुमिका सोडून द्यावी असेही मोदी या वेळी म्हणाले. 2012 मध्ये झालेल्या एका मुख्यमंत्री संमारंभात काँग्रेसच्याच एका मुख्यमंत्र्याने काँग्रेसवर आरोप केले होते. अरूणाचल प्रदेशाच्या प्रश्नाची जाण असणारे सरकार दिल्लीत तयार करण्याची मोदींनी लोकांना विनंती केली. या सभेत अरूणाचल प्रदेशाचे पूर्व मुख्यमंत्री गेगांग अपांग यानी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी मोदींनी काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. काँग्रेसच्या बाले किल्ला भेदण्याचा प्रयत्न करताना मोदींनी सामान्य भारतीयांच्या मनातील चीनविषयीची असुरक्षीतता वाढवण्याचा प्रयत्न केला. पूर्वत्तर राज्यातील लोकांवर अमेरिकी संस्कृतीचा पगडा असून चीन विषयी या लोकांच्या मनात असुरक्षीतेची भावना असल्याने मोदींनी आपले राजकीय प्रस्त प्रस्तापित करण्याचा प्रयत्न केला.
मोदींना पूर्वोत्तर राज्यात केलेल्या भाषणानंतर आज मोदी काय बोलणार या कडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.