आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 700 कोटींचा खजिना असलेल्या मंदिरात नरेंद्र मोदी नतमस्तक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थिरूवनंतपुरम - भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी दक्षिण भारताच्या दौ-यावर आहेत. मोदींनी केरळ दौ-या दरम्यान प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदीराला भेट दिली आहे. त्रावणकोर राजघराण्याचे राजे महेंद्र वर्मा यांच्या विनंतीवरून मोदी त्यांच्या भेटीसाठीही गेले होते. यावेळी राजे महेंद्र वर्मा यांनी पद्मनाभस्वामी मंदिराचे छायाचित्र मोदींना भेट दिले आहे.

यानंतर मोदी माता अमृतानंदमयी यांच्या 60व्या जयंतीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोल्लम येथे गेले. 'अमृतावर्षम 60' कार्यक्रमात त्यांनी माता अमृतानंदमयी यांचे आशीर्वाद घेतले.

मोदी तामिळनाडूच्या त्रिची येथे आज (गुरुवार) सायंकाळी भाजप युवक परिषदेला संबोधीत करणार आहेत. दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांतही यावेळी उपस्थित राहाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.