आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्‍त कोळसाच नव्‍हे तर कोळशाची फाईलही सरकारने खाल्‍ली, नरेंद्र मोदींची युपीएवर टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंगळुरू- या सरकारने देशाचा कोळसा खाल्‍ला. कोळसाच नव्‍हे तर कोळशाची फाईलही त्‍यांनी खाल्‍ली. आता सुप्रीम कोर्टला म्‍हणतात कोळशाची फाईल हरवली आहे. हे दिल्‍लीतील संपूर्ण सरकारच हरवले असल्‍याची टीका गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरू येथे 'भारत जिताओ' रॅलीत केली.

पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केल्‍यानंतर मोदी पहिल्‍यांदाच कर्नाटक आणि बेंगळुरूच्‍या दौ-यावर आले होते. आपल्‍या भाषणाच्‍या सुरूवातीलाच त्‍यांनी शास्‍त्रज्ञ प्रोफेसर सीएन राव आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला भारतरत्‍न पुरस्‍कार मिळाल्‍याबद्दल शुभेच्‍छा दिल्‍या. त्‍यांनी कन्‍नड भाषेमध्‍येही स्‍थानिक लोकांना संदेश देऊन खुश केले.

रालोआच्‍या काळात आयटी क्षेत्राचा विकास 40 टक्‍क्‍यांनी वाढला होता. मात्र, संपुआ-1च्‍या काळात त्‍यामध्‍ये 20 टक्‍क्‍यांनी घसरण झाली. आता हा विकास दर 9 टक्‍क्‍यांपर्यंत आला असल्‍याचा दावा मोदींनी यावेळी केला. संपुआमुळे आयटी सेक्‍टरशी निगडीत युवकांसमोर बेरोजगारीचे नवे संकट उभे राहिले आहे.

वाढती महागाई आणि कांद्याची वाढत्‍या दरावरून मोदींनी केंद्रावर निशाणा साधला. मोदी म्‍हणाले,'दोन दिवसांपूर्वी वानखेडेवर सामना सुरू होता. सचिन निवृत्त होणार होता. सचिन शतक करेन यावर स्‍टेडिअममध्‍ये लोक पैजा लावत होते. पण कांद्याच्‍या किंमतीनेच शतक गाठले.'