आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजवादी-काँग्रेस कठोर कायद्याला घाबरले, अलीगढ सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीगड - उत्तर प्रदेश निवडणुकीची तारीख जशी जवळ येऊ लागली आहे तसे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशात सभा घेत आहेत. अलीगड येथील सभेत मोदींनी पुन्हा समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीवर टीका केली. मोदी म्हणाले, 'यंदा उत्तर प्रदेशात भाजपचे वारे जोरदार आहे. जनतेला बदल हवा आहे.'

सपा-काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले, 'ते घाबरले आहेत. त्यांना भीती वाटते की मोदींना राज्यसभेतीही बहुमत मिळाले तर ते कठोर कायदे करतील.'
आम्ही भ्रष्टाचाराविरोधात लढत आहोत.. 
मोदी म्हणाले, 'कोणालाही काहीही त्रास न होता भ्रष्टाचाराविरोधात कसे लढले जाते हे आम्ही दाखवून दिले आहे.'
- यंदा भाजपचा झंझावातात अखिलेस टिकाव धरू शकणार नाही. 
- बेईमानांना आश्रय देणाऱ्यांना 70 वर्षांचा हिशोब द्यावा लागेल. उत्तर प्रदेशच्या जनतेला न्याय पाहिजे आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...