आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही सुडाचे नव्हे तर बदलांचे राजकारण करतो, मोदींचा सोनिया-राहुलवर जोरदार प्रहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी- आम्ही सुडाचे नव्हे तर बदलांचे राजकारण करतो. इतिहासात डोकावून बघितले तर राजीव गांधी, सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी यांनी संतापाचे राजकारण केले आहे, असा आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) केला.
नरेंद्र मोदींनी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार प्रहार केला. भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींनी अमेठीत संबोधित केले. अमेठीत अाज प्रचाराचा अंतिम दिवस आहे. येत्या सात मे रोजी येथे मतदान होणार आहे.

कॉंग्रेसच्या आई -मुलाचे सरकार जाणार असल्याचे संपूर्ण देशाला माहीत आहे. उत्तर प्रदेशात अमेठीची स्थिती फारच वाईट आहे. साठ महिन्यांतच अमेठीचा विकास करणार असल्याचे आश्वासन मोदींनी अमेठीतील जनतेला दिले. अमेठीतील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपने स्मृती इराणींंना उमेदवारी दिल्याचे मोदींनी सांगितले. अमेठीतून कमळ पाठवून भाजपला आणखी मजबूत करण्‍याचे आवाहन मोदींनी यावेळी दिले.

मोदी म्हणाले, आई- मुलाच्या सरकारचे दिवस भरले आहेत. भाजपला आता सत्तेपासून कोणीच रोखू शकत नाही. आम्ही बदला घेण्यासाठी नाही, बदल घडवविण्‍यासाठी राजकारण करतो. यंदाची निवडणूक सगळ्यांना थक्क करणारी असेल. येत्या 60 महिन्यांत अमेठीचा विकास झालेला दिसेल. यासाठी स्मृती इराणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इराणी यांना अमेठीतील समस्या कमी करण्‍यासाठी पाठवले आहे. राज्यसभा सदस्याच्या रुपात इराणी यांनी गुजरातमध्ये उत्कृष्ट कार्य केले आहे.

कॉंग्रेसने आतापर्यंत देशातील आम जनतेला लुटण्याचे काम केले आहे. आता मात्र असे होऊ देणार नाही. यंदाची निवडणुकीत देशात भाजपचे कमळ उमलणार आहे. विकासाचा हा विजय असेल. आम्ही लुटायला आलो आहे. जे मागतात ते लुटत नसल्याचेही मोदी म्हटले.

राजकीय पंडितांचे सर्व अंदाज खोटे ठरणार आहे. अमेठीत चाळीस वर्षांपासून एक राजघराण्याने जनतेच्या भावनांशी खेळत आहे. अमेठीत 'अ'पासून सुरुवात करावी लागणार असल्याचेही मोदी म्हणाले.

दरम्यान, अमेठी मतदार संघ राहुल गांधी यांचा गड मानला जातो. अमेठीत मोदींच्या या प्रचारसभेला अमित शहा यांचा 'मास्टर स्ट्रोक' सां‍गितला जात आहे. मोदींनी अमेठीत प्रचारसभा घेतल्याने कॉंग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियंका गांधी यादेखील वाराणसीत प्रचारसभा घेणार आहेत.

कॉंग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठीत मोदींच्या प्रचारसभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला जाणार आहे. स्मृती ईरानी यांच्या प्रचाराला धार देण्याचे काम मोदींची सभा करणार असल्याचे पक्षाच्या सुत्रांनी सांगितले.