आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरोहात नरेंद्र मोदींचा सभा मंच कोसळला; अनेक नेते झाले जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ/अमरोहा/बागपत- भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) उत्तरप्रदेशातील अमरोहा, बागपत आणि हरियाणातील गोहानामधील प्रचारसभेत संबोधित केले. मात्र, अमरोहामध्ये मोदींच्या प्रचारसभेसाठी तयार करण्यात आलेला सभामंच अचानक कोसळल्याने धावपळ उडाली. सुदैवाने मोदी मंचावर नव्हते. मात्र, मंचावर उपस्थित नेते खाली कोसळून जखमी झाले आहेत.

बागपतमध्ये अजितसिंहांवर प्रहार...
नरेंद्र मोदी यांनी बागपत येथील प्रचारसभेत अजितसिंह चौधरीसह कॉंग्रेसवर जोरदार प्रहार केला. मोदी म्हणाले, अजितसिंह यांना त्यांचे वडील चौधरी चरणसिंह यांनी दाखवलेल्या मार्गापासून भरकटले आहेत. सत्तासुख उपभोगण्यासाठी अजितसिंह यांनी कॉंग्रेसचा हात हातात घेतला आहे.

मोदींनी सभा सुरु असताना पिलरवर चढलेल्या एका तरुणाला खाली उतरण्याचेही आवाहन केले. खाली पडूनल्याने तुमचेच नव्हे तर माझेही नुकसान होणार असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. मोदींच्या या सभेसाठी दुमंजली सभामंडप तयार करण्‍यात आला होता. पहिल्यांदा अशी व्यवस्था पाहायला मिळाली.

बागपत महर्षी दयानंद सरस्‍वती यांची कर्मभूमी आहे. विशेष म्हणजे मी त्यांच्या जन्‍मभूमीहून आलो आहे. त्यामुळे बागपत येथील लोकांशी माझे वैचारिक आणि पारंपरिक नाते असल्याचे मोदींनी सां‍गितले.

कॉंग्रेस मुक्‍त भारत..
1857 चा उठाव हा ब्रिटीशमुक्त भारत बनविण्‍याच्या हेतूसाठी होता. तो आपण साध्य केला. मात्र 2014 ची निवडणूक ही कॉंग्रेस मुक्‍त भारत बनविण्याचे युद्ध असल्याचे सांगून मोदी यांनी कॉंग्रेसवर शरसंधान साधले.

कॉंग्रेस शेतकरी आणि जवानांचा सन्मान करत नाही
लाल बहादुर शास्‍त्री यांनी 'जय जवान, जय किसान' अशी घोषणा दिली होती. मात्र, कॉंग्रेस जगाचा पोशिंदा शेतकरी आणि अहोरात भारतमातेचे रक्षण करणारा जवान यांचा सन्मान करत नाही. आपल्या जवानांचे शीर कापणाण्या पाकच्या पंतप्रधानांना चिकण बिर्याणीची मेजवानी दिले जात असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.