आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP मध्ये पोलिस स्टेशन सपाचे कार्यालय झाले, SC ने फटकारले तेव्हा मंत्र्यांवर FIR दाखल - मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फतेहपूर - नरेंद्र मोदींनी रविवारी उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे विजय शंखनाद रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांच्या निशाण्यावर समाजवादी पक्ष आणि काँग्रेस होते. मोदी म्हणाले, 'उत्तर प्रदेशाचा विकास 14 वर्षांपासून वनवासात आहे. हे आता संपवले पाहिजे.' राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत मोदी म्हणाले, 'सुप्रीम कोर्टाने पोलिसांना फटकारल्यानंतर सपा सरकारमधील एक मंत्र्यावर एफआयआर दाखल होतो.'
 
जनता दुध आणि पाण्यातील फरक ओळखते
- मोदी म्हणाले, सरकारी तिजोरीतून जाहीरातींवर खर्च करुन टीव्ही आणि वृत्तपत्रांमध्ये झळकत राहाणे हे राज्यसरकारचे काम जनतेच्या नजरेतून सुटलेले नाही. जनता दुध आणि पाणी यातील फरक चांगला ओळखते. 
- तुमची नियत चांगली नाही, योजना योग्य नाही हे जनतेला माहित आहे. 
- राहुल गांधी यांचे नाव न घेता, मोदी म्हणाले, 'सगळीकडे धोबी पछाड मिळाली आहे येथे मात्र आपल्या पूर्वजांच्या नावावे काही वाचवता येईल.'
- मंत्र्यांवर एफआयआर दाखल होऊ शकत नाही, अशी परिस्थिती राज्यात असल्याचे मोदी म्हणाले. सुप्रीम कोर्टाने जेव्हा राज्य सरकारला फटकारले तेव्हा त्यांनी मंत्री गायत्री प्रजापती यांच्यावर एफआयआर दाखल केला. 
  
'दोन बुडत्यांनी एकमेकांचा हात पकडला'
- राहुल गांधींवर टीका करताना मोदी म्हणाले, 'ज्यांनी ऊन पाहिले नाही, रात्री गाव कसे असते हे ज्यांना माहित नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले हे लोक. 27 वर्षे यूपी बेहाल ओरडत होते.'
- 'दोघांनी विचार केला की तुही बुडत आहे मीही बुडत आहे. चला आपण एकमेकांचे हात पकडू कदाचीत वाचू.'
- मोदी म्हणाले,'जेव्हा दोघांनी एकमेकांचा हात पकडला आणि सोबत निघाले तेव्हा पहिल्या दिवशीच कळाले रस्ता फार अवघड आहे. रस्त्याने निघाले आणि रस्त्यात लटकलेले तार पाहिले तेव्हा अखिलेश घाबरले नाही मात्र दुसरा सहकारी घाबरला. शॉक बसला तर ! अखिलेश घाबरले नाही कारण त्यांना माहित होते, तारा आहेत पण वीज कुठे आहे?'
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...