आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिपूरमध्ये काँग्रेसने जे 15 वर्षात केले नाही ते आम्ही 15 महिन्यात करु - नरेंद्र मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंफाळ - काँग्रेसला तुम्ही 15 वर्षे दिली आम्हाला फक्त 5 वर्षे द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मणिपूरच्या मतदारांना केले. मणिपूर विधानसभेसाठी 4 आणि 8 मार्चला मतदान होणार आहे. येथील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी इंफाळमधील लांगजिंग अचोऊबा मैदानावर मोदींची जाहीर सभा झाली. मोदी म्हणाले, काँग्रेसने जे काम 15 वर्षांत केले नाही ते आम्ही 15 महिन्यात करुन दाखवू.  दरम्यान, मोदींच्या सभेला 6 फुटीरतावादी संघटनांनी विरोध केला होता. त्यांचा आरोप आहे की मोदी राज्यातील नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. 
 
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 
- मोदी म्हणाले, 'या आधी पूर्वोत्तर राज्यांमध्ये केंद्रातून कोणी येत नव्हते. मी आलो. एनईसीची येथे मिटिंग होते. आमचे मंत्री तेव्हा येथे असतात. त्यांच्यासोबत चर्चा करुन पूर्वोत्तरच्या समस्यांवर तोडगा शोधला जातो. 40 वर्षांपूर्वी मोरारजी पंतप्रधान होते. तेव्हा ते पूर्वोत्तरला आले होते. त्यानंतर मी आलो. येथे मुक्काम केला. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आयडियाज व प्लॅनिंगला लागू करण्यासाठी योजना तयार केली. '   
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...