आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्ड वर्क तर हार्वर्डपेक्षा शक्तिवान, नरेंद्र मोदी यांचा अमर्त्य सेन यांना टोला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराजगंज - देशातील जीडीपीचे आकडे पाहता विकास दरावर नोटाबंदीचा काहीही परिणाम झाला नसल्याचे नमूद करून हे हार्ड वर्क हार्वर्डपेक्षा शक्तिशाली असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी नोटाबंदीच्या टीकाकार अर्थशास्त्रज्ञांना टोला लगावला.
 
एकीकडे नोटाबंदीनंतर हार्वर्ड विद्यापीठातील अभ्यासक काय म्हणतात याचे दाखले देणारे लोक आहेत आणि दुसरीकडे गरीब लोकांची मुले आहेत. ही मुले आपल्या कष्टातून देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत, असे मोदी म्हणाले. येथे आयोजित जाहीर सभेत मोदी बोलत होते. खरे म्हणजे हार्ड वर्क हेच हार्वर्डपेक्षा शक्तिशाली आहे, असे मोदींनी नमूद केले. नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ आणि हार्वर्ड विद्यापीठात प्रोफेसर म्हणून कारकीर्द गाजवलेले अमर्त्य सेन यांनी नोटाबंदीवर टीका करून अर्थव्यवस्था डबघाईला आल्याचे म्हटले होते.
 
या अनुषंगाने मोदींनी हे वक्तव्य केले. मंगळवारी देशातील सकल आर्थिक विकासाचा दर अपेक्षेपेक्षाही अधिक ७.१ टक्क्यांवर पोहोचला असल्याचे सरकारने जाहीर केले. हा विकास दर चीनच्या ६.८ पेक्षा अधिक आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये, पाहा मोदींचे भाषण.. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...