आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM मोदी म्हणाले- SCAM म्हणेज समाजवादी, काँग्रेस, अखिलेश, मायावती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या प्रचार रॅलीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या आघाडीचा समाचार घेतला. मोदी म्हणाले, 'कालपर्यंत काँग्रेस नेते गावागावात फिरून समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशाला कसे लूटले हे सांगत होते. उत्तर प्रदेश सरकारला बदनाम केले जात होते. एका रात्रीतून असा काय बदल झाला की जे सकाळ-संध्याकाळ एकमेकांच्या विरोधात बोलणारे, आज गळ्यात गळे घालून फिरत आहे, आणि बचाओ.. बचाओ ओरडत आहेत.' मेरठमध्ये मोदींची प्रचार सभा झाली.  मेरठसह मुझफ्फरनगर, बागपत, हापूड आणि गाझियाबाद जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी ते आले होते.

मोदी म्हणाले आता लढाई SCAM विरोधात 
- मोदी म्हणाले, निवडणूक SCAM विरोधात भाजपची लढाई आहे. SCAM म्हणजे, समाजवादी, काँग्रेस, अखिलेश आणि मायावतींविरोधात आपली लढाई आहे. 
- मोदी म्हणाले, 'मी भाग्यवान ठरलो आहे. मेरठच्या पवित्रभूमीवर येण्याची संधी मला लाभली आहे. 1857 च्या उठावाची ठिणगी येथेच पडली होती. या भुमितून उत्तर प्रदेश निवडणूक प्रचाराची सुरुवात करण्याची मला संधी मिळत आहे. तेव्हा इंग्रजांच्या तावडीतून मुक्ती मिळवायची होती. आज गरीबीसोबत आपल्याला लढायचे आहे. तेव्हा परकीय शक्तींसोबत आपला लढा होता, आज भ्रष्ट लोकांसोबत आपली लढाई आहे.'

भ्रष्टाचार आणि गरीबीविरोधात लढा 
- मोदी म्हणाले, 'भाजपची लढाई माफियाराज विरोधात आहे. भ्रष्टाचार करुन गुंडाराज करुन गुन्हेगारी प्रवृत्तींना राजाश्रय देणाऱ्यांविरोधात आमची लढाई आहे.'
- मोदी म्हणाले, 'उत्तर प्रदेश हे सर्वोत्तम राज्य होऊ शकते. तेवढी क्षमता या भूमित आहे, येथील युवकांमध्ये आहे. मात्र येथील युवकांना शेती-शिवार सोडून शहरांमध्ये झोपडपट्टी राहावे लागते.'
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...