आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखतींच्या माध्यमातून युवकांची होते लूट, आम्ही ती थांबवू, रोहानियातील प्रचारसभेत मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - उत्तर प्रदेश विधानसभेच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात मुक्काम ठोकून आहे. सोमवारी त्यांनी वाराणसीपासून 20 किलोमीटर अंतरावरील रोहनिया येथील प्रचारसभेला संबोधित केले. मोदी म्हणाले, 'देशाचा विकास करायचा असेल तर सर्वप्रथम गावांचा विकास झाला पाहिजे.' मोदींनी आज माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या निवासस्थानाला भेट दिली. त्याबद्दल ते म्हणाले, शास्त्रीजींपासून आम्हाला प्रेरणा मिळते. मुलाखती बंद करण्याचे आश्वासन देताना मोदी म्हणाले, नोकरीसाठी मुलाखतीच्या माध्यमातून युवकांची लूट होते. ती थांबवण्याचे काम आम्ही सत्तेत आल्यानंतर करु. 

रोहनिया येथील सभेत मोदी म्हणाले, 'लाल बहादूर शास्त्रींच्या घरी गेलो, त्यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण केले. त्यांनी दिलेला जय जवान - जय किसानचा मंत्र आज घराघरात पोहोचला आहे. हा मंत्र देणाऱ्या महापुरुषाला नमन करण्यासाठी तुमच्यामध्ये आलो आहे.'

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...