आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महिलेने जयललितांवर केला होता विषप्रयोग, नरेंद्र मोदींंनी अम्मांंना केले होते सावध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे सोमवारी मध्यरात्री निधन झाले. 74 दिवसांपासून त्यांच्या चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. रविवारी, सायंकाळी जयललिता यांची हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांची प्रकृती आणखी खालवली. अखेर मृत्यूशी त्यांची झुंज अपयशी ठरली आणि सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

तुम्हाला कदाचित माहीत नसावे, ​जयललिता यांच्यावर यापूर्वी प्राणघातक संकट उद्धभवले होते. ते म्हणजे त्यांच्या विषप्रयोग करण्यात आला होता. त्यांच्या अत्यंत विश्वासू आणि जवळच्या महिलेनेच हे कारस्थान केले होते.

बंगळुरुतील हॉटेलमध्ये जयललितांंवर झाला होता विषप्रयोग...
रिपोर्टनुसार, पती (नटराजन) मुख्यमंत्री बनवण्यासाठी शशिकला हिने जयललिता यांना विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, बंगळुरुमधील एका हॉटेलमध्ये शशिकला हिने हा कट रचला होता. पण, जयललिता यातून सुखरुप बाहेर आल्या होत्या. 17 डिसेंबर 2011 रोजी शशिकला आणि नटराजन यांची जयललिता यांनी घरातून, त्याचबरोबर पक्षातूनही हकालपट्टी केली होती. पण, तुरुंगातून बाहेर आल्यानंंतर शशिकलाूू हिने जयललिता यांचे पाय धरुन चूक कबूल केल्यानंतर त्यांनी त‍िची चूक पदरात घेेऊन तिला माफ केले होते.

शशिकलाने जयललितांसोबत अशी साधली जवळीक...
शशिकला हिने जयललितांचा विश्वास संपादन करण्यासाठी एक नाही अनेक युक्ती लढवल्या होत्या. त्यांना केव्हा काय हवे, हे हेरुन घेतले. त्या कोणत्या कार्यक्रमासाठी कोणती साडी नेसणार आहे, या सगळ्या गोष्टी शशिकला लक्षात ठेवत होती. शशिकलाने अल्पवधीत जयललितांचा विश्वास संपादन केला होता. तामिळनाडूतील एका छोट्याशा गावातून ऐशो-आरामात आयुष्य घालवण्याचे स्वप्न घेऊन चेन्नईत पोहोचलेली शशिकला हिला तामिळनाडूची राजकीय माफिया बनली आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, शशिकला हिच्या परवानगीशिवाय जयललिता यांना भेटणे शक्य नव्हते...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...