आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशिकला यांनी जयललितांवर केला होता विषप्रयोग, मोदींनी अम्मांना केले होते सावध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री पनिरसेल्वम यांनी रविवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. रविवारी दुपारी झालेल्या बैठकीत शशिकला यांची विधिमंडळाच्या नेत्या म्हणून शशिकला यांची निवड झाली आहे. त्यानंतर पनिरसेल्वम यांनी पदाचा राजीनामा दिला.

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे 5 डिसेंबरला निधन झाले. 74 दिवसांपासून त्यांच्या चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. जयललिता यांची हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांची प्रकृती आणखी खालवली होती. मृत्यूसोबत सुरु असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

तुम्हाला कदाचित माहीत नसावे, ​जयललिता यांच्यावर यापूर्वी प्राणघातक संकट उद्धभवले होते. ते म्हणजे त्यांच्या विषप्रयोग करण्यात आला होता. त्यांच्या अत्यंत विश्वासू आणि जवळच्या महिलेनेच हे कारस्थान केले होते.

बंगळुरुतील हॉटेलमध्ये जयललितांवर झाला होता विषप्रयोग...
रिपोर्टनुसार, शशिकला नटराजन यांनी पती (नटराजन) यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी जयललिता यांना विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, बंगळुरुमधील एका हॉटेलमध्ये शशिकला यांनी हा कट रचला होता. पण, जयललिता यातून सुखरुप बाहेर पडल्या होत्या. 17 डिसेंबर 2011 रोजी शशिकला आणि नटराजन यांची जयललिता यांनी घरातून, त्याचबरोबर पक्षातूनही हकालपट्टी केली होती. पण, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शशिकला यांनी जयललिता यांचे पाय धरुन आपली चूक कबूल केली होती. जयललिता यांनी शशिकला यांना माफ केले होते.

शशिकलाने जयललितांसोबत अशी साधली जवळीक...
शशिकला हिने जयललितांचा विश्वास संपादन करण्यासाठी एक नाही अनेक युक्ती लढवल्या होत्या. त्यांना केव्हा काय हवे, हे हेरुन घेतले. त्या कोणत्या कार्यक्रमासाठी कोणती साडी नेसणार आहे, या सगळ्या गोष्टी शशिकला लक्षात ठेवत होती. शशिकलाने अल्पवधीत जयललितांचा विश्वास संपादन केला होता. तामिळनाडूतील एका छोट्याशा गावातून ऐशो-आरामात आयुष्य घालवण्याचे स्वप्न घेऊन चेन्नईत पोहोचलेली शशिकला हिला तामिळनाडूची राजकीय माफिया बनली आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, शशिकला हिच्या परवानगीशिवाय जयललिता यांना भेटणे शक्य नव्हते...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...