आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Security In Chatra And Gumla Rally

गुजरातचा \'सिंह\' मोदी, कमांडोंच्‍या कवचकुंडलात! बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुमला - नरेंद्र मोदी यांनी प्रचार मोहीम सुरू करण्यापूर्वीच माओवाद्यांनी दोन मोबाइल टॉवरवर स्फोट घडवून ते उडवले. त्यामुळे मोदींच्या सभेसाठीची सुरक्षा व्‍यवस्‍था वाढवण्यात आली. मोदी झारखंडमधील गुमल्यात सभास्‍थळी अत्‍यंत कडक सुरक्षाव्‍यवस्‍थेत पोहोचले. सभेला संबोधीत करताना ते म्हणाले, ‘वाजपेयींमुळे झारखंड राज्य निर्माण झाले.’ त्‍यामुळेच आज 40 टक्के आदिवासी लोक भाजपासोबत आहेत. झारखंडच्या निमित्ताने त्यांनी लालूंवरही निशाणा साधला.

18 कमांडोचे सुरक्षाकवच
मोदी गुमल्‍याला सभेस्‍थानी पोहोचताच त्‍यांना सहा कमांडोनी आपल्‍या सुरक्षाकडयात सभास्‍थानी पोहचवले. विमानतळापासून ते सभास्‍थानापर्यंत कडेकोट सुरक्षा ठेवण्‍यात आली. मोदींच्‍या सुरक्षेसाठी मंचावर 18 एनएसजी कमांडोचा पहारा होता. त्‍यानंतर CRPF जवान, जिल्‍हा पोलिस बल आणि सॅफ अशा चार सुरक्षा बलांनी मोदींना सुरक्षा दिली.

एक दिवसपूर्वी शोधाशोध मोहिम
बॉम्‍ब शोध पथक, श्‍वान पथकाने सभास्‍थळाचे एकदिवस पूर्वीच शोधाशोध केली. गुजरातहून आलेले डीआयजी खूर्शीद आलम, डीएसपी के.बी.पारीख आणि इंन्‍स्‍पेक्‍टर डी. बी. पटेल यांनी स्‍वत: सुरक्षा व्‍यवस्‍थेवर लक्ष ठेवले.

पुढील स्‍लाइडवर पाहा, मोदींना पुरविण्‍यात आलेल्‍या सुरक्षेची छायाचित्रे...