आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माध्यमांकडे शक्ती आहे, पण गैरवापर नको-चेन्नईत मोदींचे वक्तव्य, करुणानिधींनाही भेटले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींनी तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचीही भेट घेतली. - Divya Marathi
मोदींनी तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचीही भेट घेतली.
चेन्नई - पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी एका दिवसासाठी चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत. एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात मोदी म्हणाले, महात्मा गांधींनी माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले होते. पत्रकारांकडे नक्कीच शक्ती असते. पण त्याचा चुकीचा वापर करणे गुन्हा आहे. राजकारणाशिवाय इतर मुद्द्यावरही मीडियाने लक्ष केंद्रीत करायला हवे. त्यापूर्वी मोदींनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री सीएम पलानीसामी यांची भेट घेतली. दोघांमध्ये चेन्नईसह राज्यातील अनेक भागांत होत अशलेल्या पाऊस आणि पुराच्या स्थितीवर चर्चा झाली. पंतप्रधानांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेप्रमुख एम. करुणानिधी यांचीही भेट घेतली. ते गेल्या चार वर्षांपासून आजारी आहेत. 

माध्यमांची शक्ती पाहून इंग्रजी घाबरले होते... 
- मोदी म्हणाले, माध्यमे ही समाजात बदल घडवून आणण्याची साधने असतात. ते तुम्हाला केवळ बातम्या देतात असे नसून, ते तुमचे विचार व्यापक बनवण्याचे कामही करतात. माध्यमांनी स्वतःदेखल व्यापक बनायला हवे. माध्यमांमध्ये चांगली स्पर्धा असणे ही लोकशाहीची शक्ती आहे. 
- भारताच्या प्रादेशिक वृत्तपत्रांची शक्ती पाहून ब्रिटीशही घाबरून पळून गेले होते. आजही प्रादेशिक भाषांची शक्ती तेवढीच आहे. संपादकीय स्वातंत्र्याचा वापर जनहिताच्या मुद्द्यांसाठी करायला हवा. लिखाणाचे स्वातंत्र्य म्हणजे, लोकांना चुकीची माहिती देणे असे नव्हे. 

राजकारणाशिवाय इतर मुद्देही उचला 
- पंतप्रधान म्हणाले, महात्मा गांधींनी माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले होते. पत्रकारांकडे नक्कीच शक्ती असते. पण त्याचा चुकीचा वापर करणे गुन्हा आहे.
- सध्या बहुतांश मीडिया हा राजकारणाच्या आसपासच फिरत असतो. राजकारणाशिवाय इतरही काही मुद्दे आहेत, ज्यावर फोकस करायला हवे. भारतात राजकारणापशिवाय इतरही बरेच काही आहे. देशाची 125 कोटी जनता त्याबाबत वाचल्यानंतर आनंदी होत असते. 
- मीडियाने स्वच्छ भारत मोहिमेत, महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यासाठी मी त्यांचे आभार मानू इच्छितो. त्याचबरोबर एक भारत श्रेष्ठ भारत तयार करण्यासाठीही माध्यमांची जबाबदारी महत्त्वाची आहे. आपण वातावरण बदलाबाबत लोकांना जागरूक करण्याचे काम करू शकतो का. 

करुणानिधींना भेटले मोदी.. 
- भाजपचे जनरल सेक्रेटरी पी. मुरलीधर राव यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी दुपारी 12 वाजता करुणानिधी यांची गोपालापुरम या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. 

तमिळनाडूत कोसळतोय पाऊस.. 
- चेन्नईसह तमिळनाडूच्या अेक भागांत पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधानांनी यामध्ये मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सीएम पलानीसामी यांना केंद्राने संपूर्ण मदतीचे आस्वासन दिले आहे. 
- राज्य सरकारने सोमवारी चेन्नई, कांचीपुरम आणि त्रिरुवल्लूरमध्ये सर्व शाळा-कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...