रांची - केंद्रात वंशवादाचा नायनाट झाला असून आता झारखंडची बारी आहे, असे म्हणत पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी शनिवारी झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू सोरेन आणि त्यांचे मुख्यमंत्री पुत्र हेमंत सोरेन यांच्यावर जोरदार टीका केली.
सध्या झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी झारखंडची सत्ता पूर्ण बहुमत असलेल्या सरकारकडे देण्याचे आवाहन केले आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते.