आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi To Face Arvind Kejriwal In Varanasi News In Marathi

भाजपवाले रामालाही पळपुटा म्हणाले असते : केजरीवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - आम आदमी पार्टीचे (आप) नेते अरविंद केजरीवाल वाराणसीतून नरेंद्र मोदींविरुद्ध मैदानात उतरतील. मंगळवारी गंगेच्या घाटावर रोड शो करून नंतर जाहीर सभेत उमेदवारीची घोषणा केली. रोड शोदरम्यान प्रचंड गोंधळ झाला. अनेकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले, अंडे आणि शाईपण फेकली.

दुपारनंतर केजरीवाल यांचा ताफा बेनियाबाग मैदानात दाखल झाले. या वेळी उपस्थित पाठीराख्यांचे केजरींनी मत जाणून घेतले. ‘वाराणसीतून मी मोदींविरुद्ध निवडणूक लढवावी काय?’, असा प्रश्न विचारून हात उंचावून मत मांडण्याचे त्यांनी आवाहन केले. सर्मथकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत हात उंचावले आणि केजरींनी उमेदवारीची घोषणा करून टाकली.

'तुम्हाला खुशखबर द्यायची आहे. 1 एप्रिलपासून गॅस दुप्पट महागणार होता. आम्ही विरोध केला. आता आयोगानेही मज्जाव केला. अंबानी, अदानींसाठी हे उभे भाजपवाले आम्हाला पळपुटे म्हणताहेत. प्रभू श्रीरामांनी वडिलांचे वचन पाळण्यासाठी 14 वष्रे सत्तात्याग केला. तेव्हा हे भाजपवाले असते ना, तर श्रीरामालाही पळपुटा म्हणाले असते. भरतही सिंहासनावर विराजमान झाला नाही. तेव्हा भाजप असता तर भरतालाही पळपुटाच म्हणाले असते. अहो, मुख्यमंत्र्यांची खुर्ची कुणाला नकोय? आम्ही ती तत्त्वांसाठी सोडली. या भाजपने एखाद्या सरपंचाचा असा राजीनामा देऊन दाखवावा.. खासदार व्हायचे असते तर मी सुरक्षित जागा निवडली असती. आता तुम्हीच सांगा, मी वाराणसीत मोदींविरुद्ध निवडणूक लढवावी?.. समोर गर्दीतून होकार उमटला. नंतर केजरी म्हणाले, ‘मग ठीक, मी पण तयार आहे..’