गांधीनगर - मथळा वाचून अनेकांना आश्चर्य वाटले असेल, पण हे खरे आहे. देशाचे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगलींनंतर अमेरिकेने व्हिसा देण्यास नकार दिला होता. पण त्याआधीच एकदा मोदी अमेरिकेला जाऊन आले आहेत. तेव्हा ते पंतप्रधान पदाचे उमेदवार नव्हते किंवा गुजरातचे मुख्यमंत्रीही नव्हते. ते केवळ आरएसएसचे प्रचारक होते. तेव्हा आरएसएसमध्येही ते फार मोठ्या पदावर नव्हते. पण त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि प्रभावी कार्यपद्धतीने सगळेच प्रभावित होते. त्यामुळेच त्यांना अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली होती. ही 1990 ची गोष्ट आहे.
गेल्या गुरुवारी मोदींनी मुख्यमंत्री म्हणून 13 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतत गुजरातची जबाबदारी आनंदीबेन पटेल यांच्याकडे सोपवली. गुरुवारी आनंदीबेन यांचा शपथविधी गांधीनगरमध्ये झाला. याठिकाणी मोदींसह गुजरातचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. पहिल्या रांगते एक दाम्पत्य बसलेले होते. मोदींनी त्यांना पाहताच त्यांनी इशा-यानेच त्यांचे स्वाहत केले. अनेकांना हे पाहून आश्चर्य वाटले. मोदी आणि या दाम्पत्यामध्ये काय नाते असावे, असा प्रश्न त्यांना पडला. शिकागोमध्ये राहणा-या या दाम्पत्याचे नाव म्हणजे डॉ. भरतभाई बाराई आणि पन्नाबेन बाराई.
पुढे वाचा...डॉ. भरतभाई आणि पन्नाबेन यांनी मोदींबाबत सांगितलेल्या काही रंजक बाबी