आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Narendra Modi Will Be In Town, News In Marathi, Surajkund

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा सुपडा साफ करा, मोदींचे खासदारांना आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरीदाबाद- सुरजकुंडमध्ये भाजपच्या नवनियुक्त खासदारांचे प्रशिक्षण शिबिर सुरु आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना 'एमपी विथ डिफरन्स' बनण्याचा पाठ शिकवला. मोदी यांनी खासदारांना सांगितले, की 'मी पहिल्यांदाच खासदार बनलो असून सध्या पंतप्रधान कार्यालयात प्रशिक्षण घेतो आहे.' खासदारांनी आचार, विचार आणि व्‍यवहारावर फोकस करण्याची आवश्यकता आहे. तसेच संसदीय आचरण आणि शिष्‍टाचाराचे कोणत्याही परिस्थितीत पालन करायला हवे. आपल्या मतदार क्षेत्रात‍ील विकासकामांवर भर द्यावा. मिळाल्या निधीचा पुरेपूर वापर करावा. तसेच जनता आणि प्रसारमाध्यमांशी योग्य समन्वय राखण्याचा सल्ला दिला आहे. देशातील काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा सुपडा साफ करण्याचेही आवाहन नरेंद्र मोदी यांनी आपल्या खासदारांनी केले आहे.

शनिवार आणि रविवार, असे दोन दिवस हे शिबिर चालणार आहे. आज (शनिवार) शिब‍िराचा पहिला दिवस असून भाजपचे सर्व खासदार सुरजकुंड येथे पोहोचले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी या शिबिराच्या 'हेडमास्टर'ची भूमिका पार पाडत आहे.

दिल्‍ली-हरियाणाच्या सीमेवर असलेल्या 'सुरजकुंड' या निसर्गरम्य परिसरातील एका हॉटेलमध्ये भाजपचे शिबिर आयोजित करण्‍यात आले आहे. शिबिरात एकूण 11 सत्र होणार आहे.

सुरजकुंड निसर्गरम्य ठिकाण...
हरियाणा राज्यातील फरीदाबाद ज़िल्ह्यात सुरजकुंड निसर्गरम्य ठिकाण आहे . येथे एक प्रसिद्ध आणि प्राचीन जलाशय आहे. सुरजकुंडमध्ये फेब्रुवारी महिन्यात शिल्प मेळ्याचे आयोजन केले जाते.
शिबिरातील ठळक मुद्दे...
- भाजपचे जवळपास 195 खासदार या शिबिरात सहभागी होतील. यात लोकसभेचे 170 आणि राज्यसभेचे 25 खासदारांचा सभावेश आहे.
- शिबिरात 40 एससी/एसटी खासदार असून महिला खासदारांची संख्या 30 आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षातील ज्येष्ठ नेते नवनियुक्त खासदारांना संसदीय कामकाजाबाबत मार्गदर्शन देती. तसेच आपला कामाचा अनुभव सांगितली.
- नवनियुक्त खासदारांना प्रशासकीय कामाची पद्धत, खासदार निधी कसा खर्च करावा याबाबत माहिती देण्यात येईल.
- कठीण परिस्थित कसे काम करावे, जनता तसेच मीडियाशी कसा समन्वय राखावा याबाबत मार्गदर्शन दिले जाईल.
- संसदेत जनतेच्या मागण्या मांडाव्यात. शून्‍यकाल सत्रात दोन्ही सभागृहात जनतेशी संबंधित प्रश्न उपस्थित करून त्यावर चर्चा घडवून आणण्याबाबत माहिती दिली जाईल.
- संसदेत खासदारांची उपस्थिती अनिवार्य आहे. आपल्या मतदार क्षेत्रातील समस्या तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत.
- शिबिरात सहभागी झालेल्या खासदारांकडून प्रत्येक एक-एक हजार रुपये आकारण्यात आले आहे.
- शिबिरात फक्त शाकाहारी जेवण मिळेल.

सुरक्षेसाठी कंमाडो तैनात...
भाजपच्या प्रशिक्षण शिबिराच्या सुरक्षेसाठी कमांडो तैनात करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष सुरक्षा देण्यात आली आहे. यात एसपीजीच्या (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) कंमाडोज् मह‍त्त्वाची भूमिका बजावतील. हरियाणाचे डीजीपी एस.एन. वशिष्‍ठ हे स्वत: शुक्रवारी सुरजकुंड येथे पोहोचले. शिबिराच्या सुरक्षा व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. पोलिस आयुक्त अरशिंदर सिंह चावला हे उपस्थित होते. अरशिंदर सिंह स्वत: दोन दिवस येथे थांबून सुरक्षेचे नेतृत्त्व करणार आहे. 900 हून अधिक जवान तैनात करण्यात आले असल्याचे सिंह यांनी सांगितले.

कांत अँक्लेवपासून सुरजकुंडपर्यंतचा शूटिंग रेंज मार्ग दोन तासांसाठी बंद करण्यात आला आहे. याच मार्गावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत.
(फोटो: सुरजकुंडमध्ये आयोजित भाजप प्रशिक्षण शिबिराचे उद्‍घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह)
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, शिबिराच्या तयारीचे छायाचित्रे...